Coronavirus : औषधांच्या वितरणासाठी  'एफडीए'चा नियंत्रण कक्ष

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

राज्यात कोरोनाच्या उद्रेकामुळे औषध उत्पादन आणि वितरणात अडचणी निर्माण होत आहेत. या अडचणींचे तत्परतेने निराकरण करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे.

पुणे - राज्यात कोरोनाच्या उद्रेकामुळे औषध उत्पादन आणि वितरणात अडचणी निर्माण होत आहेत. या अडचणींचे तत्परतेने निराकरण करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जगातील बहुतांश देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. महाराष्ट्रातही या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक नागरिकाला औषध उपलब्ध होणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र, औषधाचे वितरण आणि त्याचे उत्पादन यात अडचणी निर्माण होत आहेत. त्यातून तातडीने मार्ग काढण्याच्या दृष्टीने 'एफडीए' च्या मुख्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.  

पोलिस आधीक्षक तथा 'एफडीए'चे सहआयुक्त (दक्षता) सुनील भारद्वाज यांच्या नियंत्रणाखाली हा नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. औषध वितरणात काही अडथळे असल्यास नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी 1800222364 किंवा 020-26592362 किंवा 63 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: FDA control room for drug delivery