
गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत असल्याने या रुग्णांसाठी पुण्यात ७००, मुंबईत २०० आणि उर्वरित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मिळून ४३० असे राज्यभरात एकूण १ हजार ३३० खाटा असलेले विलगीकरण कक्ष येत्या आठवडाभरात कार्यान्वित होणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली.
मुंबई - गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत असल्याने या रुग्णांसाठी पुण्यात ७००, मुंबईत २०० आणि उर्वरित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मिळून ४३० असे राज्यभरात एकूण १ हजार ३३० खाटा असलेले विलगीकरण कक्ष येत्या आठवडाभरात कार्यान्वित होणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली.
आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
देशमुख यांनी मंत्रालयात १८ वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठात्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी डॉ. संजय मुखर्जी, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, ‘हाफकिन’चे व्यवस्थापकीय संचालक देशमुख यांच्यासह वैद्यकीय शिक्षण विभागाचे संबंधित उपस्थित होते.