Coronavirus : लॉकडाऊनबाबत महत्त्वाची बातमी; सरकारकडून तीन झोन घोषित

वृत्तसंस्था
Sunday, 12 April 2020

निर्बंध हटविले जाणार

- रेड झोनमध्ये असेल तर...

मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग पाहता देशातील लॉकडाऊन वाढविण्याचा विचार केला जात आहे. त्यापूर्वीच महाराष्ट्र राज्यात लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने हा निर्णय घेतला असून, ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. त्यानंतर आता राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्याची विभागणी तीन झोनमध्ये करण्यात आली आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महाराष्ट्र सरकारने राज्यातील जिल्ह्यांची विभागणी रेड, ऑरेंज आणि ग्रीन या झोनमध्ये केली आहे. त्यानुसार मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रायगड, नागपूर, औरंगाबाद, सांगलीचा समावेश रेड झोनमध्ये करण्यात आला आहे. तर कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर, जळगाव, उस्मानाबाद, बीड, जालना, हिंगोली, लातूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, गोंदिया, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज झोनमध्ये ठेवण्यात आले आहे. याशिवाय ग्रीन झोनमध्ये नांदेड, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, धुळे, नंदुरबार, सोलापूर, वर्धा, परभणीचा समावेश आहे. 

Coronavirus

१५ अधिक रुग्ण असतील तर रेड झोन

कोरोनाचे १५ पेक्षा अधिक रुग्ण असलेल्या जिल्ह्यांचा समावेश रेड झोनमध्ये करण्यात आला असून, त्यापेक्षा कमी रुग्ण संख्या असलेल्या जिल्ह्यांना ऑरेंज झोनमध्ये ठेवण्यात आले आहे. तर एकही रुग्ण नसलेल्या जिल्ह्याचा समावेश ग्रीन झोनमध्ये करण्यात आला आहे. 

रेड झोनमध्ये असेल तर...

ज्या जिल्ह्यांना रेड झोन जाहीर करण्यात आले ते सर्व जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन आता सुरुच राहणार असून, तेथील निर्बंध आणखी कठोर केले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर ऑरेंज झोनमधील जिल्ह्यांच्या सीमा बंदच राहतील. तिथले निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात येईल. 

मोठी बातमी

निर्बंध हटविले जाणार

ग्रीन झोनमध्ये जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा मिळणार आहे. कारण अशा जिल्ह्यातील निर्बंध टप्प्याटप्प्याने हटवले जाणार आहेत. त्यामुळे या जिल्ह्यांतील जनजीवन पूर्वपदावर येणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Government Declared Three Zones for Lock Down Purpose