Coronavirus : मी मुर्ख नाही; मी मेणबत्ती पेटवणार नाही : जितेंद्र आव्हाड

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 3 April 2020

मी मुर्ख नाही मी त्या दिवशी मेणबत्ती पेटवणार नाही. मी माझ्या घरातले दिवे बंद करणार नाही,' असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व गृहनिर्माण मंत्री व सोलापूरचे पालकमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (ता.०३) केलेल्या आवाहनावर कडाडून टिका केली आहे.

मुंबई : मी मुर्ख नाही मी त्या दिवशी मेणबत्ती पेटवणार नाही. मी माझ्या घरातले दिवे बंद करणार नाही,' असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व गृहनिर्माण मंत्री व सोलापूरचे पालकमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (ता.०३) केलेल्या आवाहनावर कडाडून टिका केली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

येत्या रविवारी (ता. ५) रात्री नऊ वाजता नऊ मिनिटे घरातले दिवे बंद करुन मेणबत्ती, तेलाचे दिवे किंवा मोबाईल टॉर्च लावा, असे आवाहन मोदीं यांनी आज सकाळी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून केले. त्यावर बोलताना आव्हाड म्हणाले, "देशाला आशा होती की मोदी साहेब जीवनावश्यक वस्तूंबाबत बोलतील. भारतातील कुठलाही नागरिक उपाशी झोपणार नाही, याबद्दल बोलतील. सॅनिटायझर व औषधं, मास्क याची उपलब्धतता मुबलक प्रमाणात असेल व कुणालाही औषधं कमी पडणार नाही, यावर बोलतील. आम्ही एक नवीन लस शोधून काढतोय यावर बोलतील. टेस्टिंग कीट कमी पडणार नाहीत यावर बोलतील. कोरोनामुळे भयग्रस्त झालेल्या जनतेला आधार देतील, असं वाटलं होतं,'' 

प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट करावासा यांना का वाटतो? असा सवाल करुन ते म्हणाले, ''त्यांनी नवीनच फंडा काढला. म्हणाले अंधार करा आणि लाईट पेटवा. लोकांच्या जीवनात अंधार पसरलेला असताना पंतप्रधानांनी त्यांच्या जीवनात उजेड आणण्याची आवश्यकता आहे. गरज आहे आणि अपेक्षा आहे. अशावेळी ते म्हणतात मोबाईलचे टॉर्च पेटवा. हा तद्दन मुर्खपणा आहे. नादान बालीशपणा आहे. मी आज जाहीर करु इच्छितो की मी काम करतोय. मी गरीबांमध्ये जातोय. मी गरीबांना जेवण देतोय. ते तेल आणि मेणबत्तीचे पैसेही मी गरीबांना देईन. मी माझ्या घरातले लाईट सुरु ठेवणार व एकही मेणबत्ती पेटवणार नाही.''

तबलिगी जमातने पाकिस्तानची उडविली झोप; ४१ हजार जणांना शोधण्याचे लक्ष

दरम्यान, कोरोना व्हायरसने आतापर्यंत जगभरात ५३ हजार दोनशे ३८ जणांचा बळी घेतला आहे. तर दहा लाख १६ हजार ४१३ जणांना या रोगाचा संसर्ग झाला आहे. तर आतापर्यंत जगभरात दोन लाख १३ हजार ३५ जण कोरानामुक्त झाले आहेत. कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका इटली, स्पेन आणि अमेरिकेला बसला आहे. आर्थिक महासत्ता असणाऱ्या अमेरिकेनंही या रोगाची धास्ती घेतली आहे. अमेरिकेत दोन लाख ४४ हजार ८७७ जणांना करोनाची लागण झाली आहे तर आतापर्यंत सहा हजांरापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Min Awhad Slams PMs 9 PM 9 Mins Appeal Will Disobey Not Light Candle