
कोरोनाच्या विषाणूंचा फैलाव जगभर होत असतानाच भारतात तबलिगी जमातच्या कार्यक्रमाने झालेल्या झालेल्या त्रासानंतर आता तबलिगी जमातने पाकिस्तानचीही झोप उडविली आहे. पाकिस्तानसाठी तबलिगी जमातीचे सदस्य आता संकट बनले आहेत. पाकिस्तान सरकारने तबलिगी जमातीच्या ४१००० सदस्यांना शोधण्यासाठी ५२०० टीम बनवल्या असून त्यांच्यावर त्यांना शोधण्याचे काम दिले आहे.
इस्लामाबाद : कोरोनाच्या विषाणूंचा फैलाव जगभर होत असतानाच भारतात तबलिगी जमातच्या कार्यक्रमाने झालेल्या झालेल्या त्रासानंतर आता तबलिगी जमातने पाकिस्तानचीही झोप उडविली आहे. पाकिस्तानसाठी तबलिगी जमातीचे सदस्य आता संकट बनले आहेत. पाकिस्तान सरकारने तबलिगी जमातीच्या ४१००० सदस्यांना शोधण्यासाठी ५२०० टीम बनवल्या असून त्यांच्यावर त्यांना शोधण्याचे काम दिले आहे.
बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
भारत, पाकिस्तान, मलेशियासोबत आशियातील काही देशात मुस्लिमांमधील तबलिगी जमात ही कोरोनाच्या प्रसार करण्यास कारणीभूत ठरत आहे. पाकिस्तानचे अधिकारी आता ४१,००० सदस्यांच्या शोधात आहेत. मार्चमध्ये लाहोरमध्ये झालेल्या तबलिगी समाजाच्या कार्यक्रमात हे सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर ते पाकिस्तानमधील कानाकोपऱ्यात पोहोचले असून पाकिस्तानसाठी ही धोक्याची घंटा आहे.
राज्यात कोरोनासाठी 30 विशेष रुग्णालये; कोणतं रुग्णालय तुमच्या जवळ?
लाहोरच्या राईविंड भागात हा पाच दिवसाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी जगभरातून अडीच लाखांच्या जवळपास लोक जमा झाले होते. या कार्यक्रमात सामील झालेले अनेक लोक हे कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. पाकिस्तानी अधिकारी आता बाकी सदस्यांचा शोध घेत आहेत कारण, त्यांना होम क्वारंटाइन करुन कोरोनापासून बाकी लोकांना सुरक्षित ठेवता येईल, लाहोरमध्ये जवळपास ४१,००० लोक कोरोना पॉझिटिव्ह असण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.
पाकिस्तानातील ६० वेगवेगळ्या शहरांत लोकांचा शोध सुरु
पाकिस्तानातील वेगवेगळ्या ६० शहरात या सदस्यांचा शोध सुरु असून किमान १०,००० लोक कोरोना संक्रमित असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. लाहोरमध्ये झालेल्या कार्यक्रमात २६ देशांतील एकूण ४५०० लोकांनी सहभाग नोंदविला असल्याचे पाकिस्तानी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यातील ७० टक्के लोक वापस आपल्या देशात गेले असल्याचे सांगण्यात येत असून ३० टक्के लोक पाकिस्तानातच असल्याचे सांगण्यात आले आहे. पंजाब सरकारकडून यांना आयसोलेट करून ठेवण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे.
पंजाबमध्ये ०८ हजार लोकांना क्वारंटाईन केले
तबलिगी जमातीच्या ०८ हजार लोकांना पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात क्वारंटाईन केले असल्याचेही सांगण्यात येत आहे. पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात परिस्थिती हाताबाहेर गेली असल्याचे सांगण्यात येत आहे. पंजाब प्रांतात सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. पंजाब प्रांतात आतापर्यंत एकूण ०९ लोकांचा मृत्यूही झाला आहे.