coronavirus: जुन्नरला १२ हजार जणांना होम क्वारंटाइनची सूचना 

coronavirus: जुन्नरला १२ हजार जणांना होम क्वारंटाइनची सूचना 

जुन्नर - मूळचे जुन्नर तालुक्यातील, पण कामानिमित्त पुणे, मुंबई व ठाणे परिसरात राहणारे सुमारे 12 हजार 88 जण कोरोनाच्या धास्तीमुळे आपापल्या गावी परतले असून, त्या सर्वांना 'होम क्वारंटाइन'ची सूचना दिली आहे. 

कोरोना सर्वेक्षणाची दुसरी फेरी तालुक्यात सुरू असून, बुधवारअखेर (ता. 25) 26 हजार 472 कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, असे सुमारे 975 कर्मचारी सर्वेक्षणाचे काम करत असल्याचे आरोग्य विभागातून सांगण्यात आले. 
coronavirus : अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्यांना पोलिसांकडून मिळणार पास

बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांच्या गावपातळीवर याद्या करण्यात येत अहे. त्यांना 'होम क्वारंटाइन'चे शिक्के मारले आहेत. त्या सर्वांनी चौदा दिवस होम क्वारंटाइन राहवयाचे अहे. या कालावधीत काही लक्षणे दिसून आल्यास त्वरित आरोग्य विभागाशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले आहे. होम क्वारंटाइन केलेल्या व्यक्तींवर स्थानिक पातळीवर ग्रामसेवक, पोलिस पाटील, सरपंच लक्ष ठेवत आहेत. 

तालुक्यात परदेशातून 69 जण आले असून, यापैकी 30 जणांचे होम क्वारंटाइनचे पहिले 14 दिवस पूर्ण झाले असून, पुढील चौदा दिवस त्यांना काळजी घेण्याची सूचना केली आहे, असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.उमेश गोडे यांनी सांगितले. 

जुन्नरमधील आरोग्य सर्वेक्षण 
- आरोग्य सर्वेक्षण करणारे कर्मचारी - 975 
- आरोग्य सर्वेक्षण केलेली कुटुंबे - 26 हजार 472 
- 'होम क्वारंटाइन' केलेले नागरिक - 12 हजार 88 
- परदेशातून तालुक्यात आलेले नागरिक - ६९

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com