क्वॉरंटाईनसाठी 10 हजार खोल्या उपलब्ध करण्याची तयारी - जितेंद्र आव्हाड

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 6 April 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विभागाचे सचिव, म्हाडा, एसआरएच्या अधिकऱ्यांसोबत घेतली महत्वपूर्ण बैठक घेतली आहे. या बैठकीत राज्यात क्वॉरंटाईनसाठी उपलब्ध जागेचा आढावा घेण्यात आला. भविष्यात क्वॉरंटाईनसाठी म्हाडा, आणि एसआरएच्या (PAP) प्रोजेक्ट अफेक्टेड पीपल्ससाठी असलेल्या साधारण 10 हजार रिकाम्या खोल्या उपलब्ध असल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विभागाचे सचिव, म्हाडा, एसआरएच्या अधिकऱ्यांसोबत घेतली महत्वपूर्ण बैठक घेतली आहे. या बैठकीत राज्यात क्वॉरंटाईनसाठी उपलब्ध जागेचा आढावा घेण्यात आला. भविष्यात क्वॉरंटाईनसाठी म्हाडा, आणि एसआरएच्या (PAP) प्रोजेक्ट अफेक्टेड पीपल्ससाठी असलेल्या साधारण 10 हजार रिकाम्या खोल्या उपलब्ध असल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गरज पडल्यास रिकाम्या मैदानात मिलिटरी टेंटप्रमाणे व्यवस्था उपलब्ध करण्याची तयारी असल्याचंही आव्हाड यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलेले असताना देशातही परिस्थिती बिघडत चालली आहे. अशातच सरकारकडून १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउन ठेवण्यात आलेले आहे. 14 एप्रिल देशव्यापी बंदीनंतर राज्यात ज्या भागात कोरोना बाधित रुग्ण आहेत त्या भागात बंदी सुरुच ठेवण्याचा सरकारचा विचार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  मात्र, ज्या भागात किंवा जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण नाही त्या ठिकाणी बंदी शिथिल करण्याचा सरकारचा विचार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, जिल्हाबंदी कायम राहणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.

मुख्यमंत्र्यांनी मला ताई म्हटले; अन्...; मुलुंडच्या एलिझाबेथ यांनी व्यक्त केला आनंद

तत्पूर्वी, आज (ता.०६) सकाळच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा ७४८वर गेला आहे. यात मुंबईतील रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. राज्य सरकार कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शक्य ते प्रयत्न करत आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आतापर्यंत ७४८ झाली आहे. रविवारी, एका दिवसात ११० नवीन रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत ५६ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून एकूण १३ नवीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आता महाराष्ट्रातील एकूण मृत्यूंचा आकडा ४५वर पोहोचला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: to provide 10000 rooms for quarantine says Jitendra Awhad