राज्यातील हॉटस्पॉट १४ वरून ५ वर; संसर्गाचा वेग मंदावला 

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 24 April 2020

जागतिक आरोग्य संघटना, आयसीएमआर यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्य शासनामार्फत कोरोना प्रतिबंध आणि उपचार केले जात आहेत. राज्यात घाबरून जाण्याची स्थिती नाही. 

मुंबई - राज्यात कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा वेग मंदावला असून हा कालावधी आता सात दिवसांवर गेला आहे. जागतिक आरोग्य संघटना, आयसीएमआर यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्य शासनामार्फत कोरोना प्रतिबंध आणि उपचार केले जात आहेत. राज्यात घाबरून जाण्याची स्थिती नाही.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मुंबईमध्ये संस्थात्मक क्वारंटाईन वाढविण्यावर भर देण्याच्या सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबई महापालिकेला दिल्या आहेत. त्यासाठी शाळा, महाविद्यालये यांचा वापर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील कोरोना हॉटस्पॉटची संख्या १४ वरून ५ वर आणण्यात यश मिळाल्याचे आरोग्यमंत्र्यांनी बुधवारी येथे सांगितले. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

आरोग्यमंत्र्यांनी नुकताच फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला, त्यावेळी त्यांनी अनेक बाबी मांडल्या. 

आशादायी चित्र 
पीपीई किटला बूथ सिस्टिमचा पर्याय 
मुंबईत शंभर फोटोबुथ बसविणार 
प्लाझ्मा थेरपीनुसार मुंबईत उपचार 
दाट लोकसंख्येच्या जागी 
होणार संस्थात्मक क्वारंटाईन 
राज्यात रोज सात हजार चाचण्या 
रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 
आता ७.१ दिवसांवर 
दररोज १३ टक्के लोक बरे होत आहेत 
राज्यातील मृत्यूदर पाच वर आला आहे. 
कोरोनामुळे झालेल्या मृत्यूच्या 
अभ्यासासाठी तज्ञांच्या दोन समित्या 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rate of corona infection slowed down