'एएमसी'च्या निवृत्त जवानांनी वैद्यकीय सेवेसाठी मदत करावी - उद्धव ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
Monday, 13 April 2020

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने त्यांच्या उपचारासाठी मनुष्यबळाची गरज पण वाढली आहे. अशा परिस्थितीमध्ये लष्कराच्या एएमसीमधून निवृत्त झालेले माजी सैनिक तसेच प्रशिक्षण पुर्ण केले आहे पण नोकरी न मिळालेल्या नर्स, वॉर्डबॉय व पॅरामेडिकल स्टाफ यांची मदतीची तयारी असेल तर त्यांनी सरकारच्या Covidyoddha@gmail.com या ई-मेलवर आपली माहिती पाठवावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी बुधवारी (ता. 8) केले आहे.

पुणे - आर्मी मेडिकल कोअरचे (एएमसी) निवृत्त वैद्यकीय अधिकारी व माजी सैनिकांनी कोविड 19 च्या विरोधात लढा देण्यासाठी वैद्यकीय सेवेत सहभागी होण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने त्यांच्या उपचारासाठी मनुष्यबळाची गरज पण वाढली आहे. अशा परिस्थितीमध्ये लष्कराच्या एएमसीमधून निवृत्त झालेले माजी सैनिक तसेच प्रशिक्षण पुर्ण केले आहे पण नोकरी न मिळालेल्या नर्स, वॉर्डबॉय व पॅरामेडिकल स्टाफ यांची मदतीची तयारी असेल तर त्यांनी सरकारच्या Covidyoddha@gmail.com या ई-मेलवर आपली माहिती पाठवावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी बुधवारी (ता. 8) केले आहे.

तसेच त्यांनी इच्छूक असलेल्या माजी सैनिक, पॅरामेडिकल स्टाफ, नर्स यांनी ई-मेलद्वारे आपले नाव, संपर्काची पत्ता, संपर्क क्रमांक, प्रशिक्षण घेतलेले क्षेत्र काळविण्याची विनंती केली आहे. दरम्यान, यासाठी राज्यातील माजी सैनिकांनी आपली नोंदणी केली असून, सध्या त्यांना "स्टॅंड बाय' म्हणजेच सज्ज राहण्याची सूचना देण्यात आली आहे. गरजेनुसार त्या-त्या जिल्ह्यातील व तालुक्‍यातील एएमसीचे माजी सैनिक यामध्ये सहभाग घेतील, अशी माहिती जिल्हा सैनिक बोर्डाचे अध्यक्ष मेजर मिलिंद तुंगार यांनी दिली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Retired AMC jawan should help with medical care uddhav thackeray