#Lockdown2.0 : राज्य सरकारच्या या आदेशाचे बांधकाम क्षेत्राकडून स्वागत

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 19 April 2020

कुठे प्रकल्प सुरू होऊ शकतात?
पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड आणि ‘पीएमआरडीए’च्या हद्दीतील ज्या भागात कोरोनाबाधितांची संख्या कमी आहे. जो भाग लॉकडाउनमध्ये नाही, असा परिसर.

शहर व परिसरातील अनेक बांधकाम प्रकल्पांवर कामगार लेबर कॅंपमध्ये राहत आहेत. तेथे काही निकष पाळून बंद पडलेल्या प्रकल्पांचे काम सुरू होऊ शकते. त्यासाठी महापालिका आणि जिल्हा प्रशासनाशी बोलणी सुरू आहे.
- सतीश मगर, अध्यक्ष, क्रेडाई इंडिया

पुणे - पुरेशी काळजी घेऊन पुणे शहरात व परिसरात बंद पडलेले बांधकाम प्रकल्प सुरू होऊ शकतात. बहुसंख्य बांधकाम कामगार साइटवरील लेबर कॅंपमध्ये अडकून पडले आहेत. त्यामुळे कोरोनाचे ‘हॉटस्पॉट’ सोडले, तर अन्य भागात हे शक्‍य असून, यासंदर्भात महापालिका आणि जिल्हा प्रशासन मार्ग काढेल, अशी अपेक्षा बांधकाम व्यावसायिक व्यक्त करीत आहेत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यात तीन मेपर्यंत लॉकडाउन सुरू आहे. मात्र वीस एप्रिलनंतर काही पुरेशी काळजी आणि बंधने घालून परवानगी देण्याबाबतचा आदेश राज्य सरकारने काढला आहे. त्यामध्ये बांधकाम क्षेत्राचाही समावेश आहे. मात्र, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर असलेला भाग वगळून ही परवानगी द्यावी, असे सरकारने स्पष्ट केले आहे. याबाबतचे अधिकार महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

राज्य सरकारच्या या आदेशाचे बांधकाम क्षेत्राकडून स्वागत होत आहे. सर्वाधिक कोरोना रुग्ण सापडलेला परिसर वगळता अन्य भागात हे शक्‍य आहे. मराठी बांधकाम व्यावसायिक संघटनेचे माजी अध्यक्ष एस. आर. कुलकर्णी म्हणाले, ‘‘शासनाचा निर्णय मोठ्या गृहप्रकल्पांना शक्‍य आहे. कारण गृहप्रकल्पाच्या ठिकाणी बांधकाम मजुरांची राहण्याची सोय करावी लागणार आहे. छोट्या बांधकाम प्रकल्पांना ते शक्‍य नाही.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: State Government welcomes this order from the construction sector