Coronavirus : आधारकार्ड ग्राह्य धरून धान्य द्या - फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 5 April 2020

ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही, त्यांचे आधारकार्ड प्रमाण मानून आणि ज्यांच्याकडे आधारकार्ड सुद्धा नाही, अशांची यादी तयार करून, ती तहसीलदारांकडून प्रमाणित करून त्यांनाही धान्य द्या. या कालावधीत एकही व्यक्ती अन्नधान्यापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घ्यायला हवी, अशी विनंती माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

मुंबई - ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही, त्यांचे आधारकार्ड प्रमाण मानून आणि ज्यांच्याकडे आधारकार्ड सुद्धा नाही, अशांची यादी तयार करून, ती तहसीलदारांकडून प्रमाणित करून त्यांनाही धान्य द्या. या कालावधीत एकही व्यक्ती अन्नधान्यापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घ्यायला हवी, अशी विनंती माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

फडणवीस यांनी आज भाजपाच्या राज्यातील सर्व मंडल अध्यक्षांशी थेट संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, केंद्र सरकारने अन्नधान्याचा साठा उपलब्ध करून दिला आहे. साधारणत: राज्यात ९ कोटी लोक हे रेशनमधून धान्य घेत असतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Take the Aadharcard and give it a grain devendra fadnavis