esakal | एसी, पंखे, कुलरसाठी अशी घ्या काळजी
sakal

बोलून बातमी शोधा

AC-Fan-Cooler

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून वातानुकूलित यंत्रे, कुलर आणि पंख्यांच्या वापराबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. प्रत्यक्ष निवासस्थाने, कामाच्या जागा आणि रुग्णालये या संसर्गापासून दूर राहावे म्हणून ही खबरदारी घेण्यात आली आहे. इंडियन सोसायटी ऑफ हिटिंग रेफरिजरेटिंग अँड एअर कंडिशनर इंजिनिअर या संस्थेकडून ही मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत.

एसी, पंखे, कुलरसाठी अशी घ्या काळजी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून वातानुकूलित यंत्रे, कुलर आणि पंख्यांच्या वापराबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. प्रत्यक्ष निवासस्थाने, कामाच्या जागा आणि रुग्णालये या संसर्गापासून दूर राहावे म्हणून ही खबरदारी घेण्यात आली आहे. इंडियन सोसायटी ऑफ हिटिंग रेफरिजरेटिंग अँड एअर कंडिशनर इंजिनिअर या संस्थेकडून ही मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत.

वातानुकूलित यंत्रे -

  • खोलीतील तापमान हे  २४ ते ३० डिग्री सेंटिग्रेट हवे, सापेक्ष आर्द्रतेचे प्रमाणे हे ४० ते ७० टक्क्यांपर्यंत असावे.
  • कोरड्या वातावरणात सापेक्ष आर्द्रता ही ४० टक्क्यांच्या खाली येता कामा नये,
  • वातानुकूलित यंत्रे बसविण्यात आलेल्या खोलीमध्ये नैसर्गिक हवा खेळती राहावी म्हणून त्या खोलीची खिडकी किंचितशी उघडी ठेवावी.
  • फॅन फिल्टर युनिटच्या वापरामुळे बाहेरील हवेतील धुलीकण हे खोलीमध्ये आत येणार नाहीत, त्यावेळी घरातील गरम अशुद्ध हवा बाहेर फेकणारे एक्झहॉस्ट फॅन सुरू ठेवले जावेत.

कुलर्स -

  • खोलीमध्ये हवा खेळती राहावी म्हणून हे कुलर बाहेरील हवेच्या योग्य पर्कात आहे ना याची काळजी घेण्यात यावी.
  • या कुलरच्या टाक्या वेळावेळी स्वच्छ केल्या जाव्यात. वेळोवेळी त्याचे निर्जंतुकीकरण करण्यात यावे तसेच पाणी देखील बदलले जावे.
  • खोलीतील आर्द्रतायुक्त हवा बाहेर पडावी म्हणून काही खिडक्या उघड्या ठेवण्यात याव्यात. बाहेरील हवेशी संपर्क नसणाऱ्या पोर्टेबल कुलरसाठी वेगळे काही करण्याची गरज नाही. कुलरची कुलिंग कमी होते तशी आतील आर्द्रता वाढते.

पंखे -

  • खोलीच्या खिडक्या अर्धवट  उघड्या ठेवून पंखे सुरू केले जावेत.
  • मुख्य खोलीच्या जवळच आतील हवा बाहेर फेकणारा पंखा असेल तर तो तसाच सुरू ठेवण्यात यावा.
  • उच्च तापमान आणि उच्च आर्द्रतेच्या वातावरणातून या विषाणूचा फारसा प्रसार होत नसल्याचे चीनमधील शंभर शहरांत झालेल्या संशोधनातून आढळून आले आहे.
loading image