Coronavirus : महाराष्ट्रात एवढ्या झाल्या आहेत कोरोनाच्या टेस्ट; मुख्यमंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 19 April 2020

शत्रू समोर असेल तर एक घाव दोन तुकडे केले असते पण हा शत्रू दिसत नाही. आपण जिद्दीने लढतो आहोत. उद्या हे युद्ध सुरु होऊन ६ आठवडे काल संध्याकाळच्या आकडेवारीनुसार आत्तापर्यंत आपण ६६ हजार ८०० टेस्ट केल्या त्यापैकी किमान ९५ टक्के रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकर यांनी सांगितले आहे.

मुंबई : शत्रू समोर असेल तर एक घाव दोन तुकडे केले असते पण हा शत्रू दिसत नाही. आपण जिद्दीने लढतो आहोत. उद्या हे युद्ध सुरु होऊन ६ आठवडे काल संध्याकाळच्या आकडेवारीनुसार आत्तापर्यंत आपण ६६ हजार ८०० टेस्ट केल्या त्यापैकी किमान ९५ टक्के रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकर यांनी सांगितले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

उद्धव ठाकरे म्हणाले की, समाधान हे आहे की, ७५ रुग्ण लोक अति सौम्य लक्षणे असलेले आहेत. ५२ रुग्ण गंभीर असून गंभीर रुग्णांना वाचवणे याकडे लक्ष केंद्रित केले आहे.  बऱ्याच वेळा हे रुग्ण शेवटच्या टप्प्यात येतात. काही बाबतीत तर चाचणीचा अहवाल येण्याच्या आतच त्या रुग्णाचे निधन झाले आहे असे लक्षात येते. कोणतेही लक्षण लपवू नका. काही वाटल्यास न घाबरता लगेच दवाखान्यात जा. लवकर या, लवकर इलाज होईल. गंभीर झालेले रुग्णदेखील बरे झाले आहेत. पण वेळेत आले पाहिजे, असे ठाकरे यांनी सांगितले.

काल संध्याकाळी खासगी क्लिनिक आणि डॉक्टर्सशी बोललो. ते देखील लढ्यासाठी तयार आहेत. हे सर्व जण आज उद्यापासून कोरोना नसलेल्या रुग्णांना तपासतील. डॉक्टर्सना आवाहन आहे की घाबरू नका. सरकार जिथे शक्य आहे ती सर्व वैद्यकीय उपकरणे आपणास देईल. गोर-गरीबांपर्यंत ८० ते ९० टक्के धान्य पोहचवले आहे. केशरी शिधापत्रिकावाल्यांना सुद्धा आता मिळण्यास सुरुवात होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Coronavirus : दिलासादायक ! देशातील आणखी एक राज्य कोरोनामुक्त

या लॉकडाऊन कालावधीत घराघरात महिलांवरील अत्याचार होता कामा नये, असे होत असेल तर महिलांना मी विनंती करतोय तर १०० नंबर फिरवा. याशिवाय मानसिकरीत्या अस्वस्थता वाढली असेल आणि समुपदेशनाची गरज असेल तर मुंबई महापालिका आणि बिर्ला यांच्या १८००१२०८२००५० क्रमांकावर तसेच आदिवासी विकास विभाग / प्रोजेक्ट मुंबई आणि प्रफुलता यांच्या १८००१०२४०४० क्रमांकावर जरूर संपर्क साधण्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A total of 66,896 tests conducted for Covid-19 in Maharashtra says Uddhav Thackeray