पालकांना मुलांच्या शाळा प्रवेशाची चिंता

शर्मिला वाळुंज
Monday, 6 April 2020

संचारबंदीदरम्यान शहरातील शाळा बंद असल्या, तरी काही पालकांना मात्र मुलांच्या प्रवेश निश्‍चितीची चिंता भेडसावत आहे. संचारबंदीआधीच अनेक शाळांनी पालकांना नवीन प्रवेश, पुढील शैक्षणिक वर्षाचे शुल्क भरण्याची सूचना केली होती; परंतू आर्थिक बाजू सक्षम नसल्याने पालकांना त्या काळात प्रवेश प्रक्रीया पूर्ण करता आलेली नाही. त्यामुळे मुलाचे शाळेत नाव निश्‍चित होईल की नाही, याबाबत अद्याप शाळेकडून काहीही संदेश आलेला नाही.

ठाणे : संचारबंदीदरम्यान शहरातील शाळा बंद असल्या, तरी काही पालकांना मात्र मुलांच्या प्रवेश निश्‍चितीची चिंता भेडसावत आहे. संचारबंदीआधीच अनेक शाळांनी पालकांना नवीन प्रवेश, पुढील शैक्षणिक वर्षाचे शुल्क भरण्याची सूचना केली होती; परंतू आर्थिक बाजू सक्षम नसल्याने पालकांना त्या काळात प्रवेश प्रक्रीया पूर्ण करता आलेली नाही. त्यामुळे मुलाचे शाळेत नाव निश्‍चित होईल की नाही, याबाबत अद्याप शाळेकडून काहीही संदेश आलेला नाही.

क्लिक करा - कोरोनामुळे ठाण्यातील कामगार वसाहतीचे स्थलांतर 

त्यातच संचारबंदी आणखी किती काळ चालणार हे ही माहित नसल्याने पालक अडचणीत आले आहेत. त्यातच बंदमुळे अनेकांची आर्थिक बाजू पूर्ण ढासळली असून डोनेशनसाठी पैसे कोठून जमा करायचे, असा प्रश्‍न असल्याची चिंता अनेक पालकांनी "सकाळ'कडे व्यक्त केली आहे. 

साधारणतः फेब्रुवारीसून शाळा प्रवेशाच्या हालचालीस सुरुवात होते. एप्रिलपर्यंत पालक आपल्या मुलांची शाळा प्रवेशाची प्रक्रीया पार पाडतात; परंतु यंदा कोरोनाचे सावट सर्वत्र घोंगावत असल्याने अनेक शाळांनी पालकांना फेब्रुवारीच्या अखेरपासूनच नवीन प्रवेश निश्‍चिती आणि पुढील शैक्षणिक वर्षाची शुल्क भरण्यासंबंधी सूचना दिल्या होत्या; परंतू त्यावेळीही अनेक पालकांकडे शाळेचे डोनेशन आणि शुल्क भरण्याएवढेही पैसे हाती नसल्याने पालक शाळांकडे काही सूट मिळवण्यासाठी विनंती करत होते. त्यातच संचारबंदी सुरु झाल्याने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. 

क्लिक करा - कल्याण-डोंबिवलीत कोरोनाबाधितांचा आकडा वाढला

लॉकडाऊन संपल्यानंतरच शैक्षणिक वर्षाचे शुल्क गोळा करण्याची कार्यवाही शाळांनी करावी, अशा सूचना शिक्षण विभागाने शाळांना दिल्या आहेत. त्यामुळे संचारबंदीदरम्यान शाळा बंद राहणार असून सध्या कोणीही शाळेत प्रवेश निश्‍चिती करु नये, अशा सूचना पालकांना समाजमाध्यमावर शाळेकडून देण्यात आल्या; परंतू शाळेतील इतर मुलांचे प्रवेश निश्‍चित झाले असताना आता आपल्या मुलाला प्रवेश मिळेल का, अशी चिंता पालकांना भेडसावत आहे. शाळांचे व्यवस्थापन कार्यालयही बंद असल्याने शाळा प्रवेशाची विचारणा, तरी कोणाला करावी असा सवाल पालक करत आहेत. 

माझी आर्थिक परिस्थिती बेताची आहे. मुलाचे शाळेतील शुल्क देखील मी टप्प्या टप्प्याने भरते. पहिलीमध्ये प्रवेश घेण्यासाठी शाळेने काही रक्कम डोनेशन आणि शुल्काची मागणी केली आहे; परंतु माझ्याकडे लगेच ऐवढी रक्कम नसल्याने डोनेशन माफ करण्यासाठी मी शाळेत खेटे घालत होते. सध्या शाळा बंद आहेत; परंतू माझे कामदेखील बंद आहे. त्यामुळे शाळा सुरु झाल्यानंतरही माझ्याकडे लगेच हातात शाळा प्रवेशासाठी रक्कम नसल्याने मुलाचा प्रवेश होईल की नाही, ही चिंता लागली आहे. 
- पायल बानखेले, पालक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parents worry about children's school access