कोरोनामुळे छायाचित्रकारांवर संक्रांत 

कोरोनामुळे छायाचित्रकारांवर संक्रांत 

खर्डी (ठाणे) : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर असलेल्या संचारबंदीमुळे शहापूर तालुक्‍यातील अनेक सार्वजनिक कार्यक्रम, लग्न, साखरपुढे, वाढदिवस यासारखे कार्यक्रम रद्द झाल्याने छायाचित्रकारांचा रोजगार बुडाल्याने सुमारे एक हजार छायाचित्रकार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. हातावर पोट असल्याप्रमाणे छायाचित्रकारांना देखील चिंता सतावत असून जवळ असलेले अन्नधान्य आणि पैसे संपत आल्याने आर्थिक अडचण जाणवू लागल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळी आली आहे. 

मार्च ते जूनदरम्यान मोठ्या प्रमाणावर लग्न सोहळे आणि सार्वजनिक, घरगुती समारंभांचा हंगाम असतो;. मात्र यंदा कोरोनामुळे या हंगामावरील संकट अधिक गडद झाले आहे. छायाचित्रणाबरोबरच एडिटर, ग्राफिक डिझाईनर, फोटो एडिटर, एक्‍सपोजिंग त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. यात अनेक व्यवसायिकांनी लाखो रुपये गुंतवणूक करून कॅमेरे, संगणक, ड्रोन आणि स्टुडिओ उभारले आहेत. याशिवाय यातून अनेकांना रोजगार मिळत होता. 

शहरी भागासह ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणावर हौशी छायाचित्रकार आहेत. किंबहुना फोटोग्राफी हेच त्यांच्या कुटुंबाचे उदरनिर्वाहाचे साधन बनले आहे. शहापुर तालुक्‍यातील खर्डी, कसारा, वासिंद, किन्हवली, शहापूर या सारख्या मोठ्या गावासह खेडोपाडी फोटो काढण्याचा व्यवसाय करत आहेत. येथील सर्वच छायाचित्रकारांचे कामकाज सध्या बंद पडले आहे.

दरवर्षी मार्च ते जूनदरम्यान मोठ्या प्रमाणावर लग्नसमारंभाच्या नोंदणी होत असल्याने सर्व छायाचित्रकारांनी नियोजन केले होते; परंतु कोरोना पाश्‍वईभूमीवर विवाह सोहळे रद्द करण्यात आले आहेत. त्यापाठोपाठ देशभर जारी झालेल्या लॉकडाऊननंतर संकटात आणखीनच भर पडली असल्याने छायाचित्रकारासोबत काम करणारे सहकारी हवालदिल झाले आहेत. 

लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागातील छायाचित्रकारांशी निगडित काम करणारे लोक आर्थिक अडचणीत आली असून उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे छायाचित्रकार आणि त्याच्याशी निगडित व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकांना आर्थिक मदत मिळावी. 
- दत्तात्रय घरत, अध्यक्ष, 
छायाचित्रकार संघटना, खर्डी  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com