लाॅकडाऊनमुळे तासनतास इंटरनेट वापरताय? येऊ शकतात गोत्यात...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 6 April 2020

कोरोना विषाणू आणि त्याची लोकांमध्ये वाढत असलेली भीती याचा अनेकजण गैरफायदा घेताना दिसत आहेत. घरात बसून असलेल्या लोकांकडून इंटरनेटच्या वापरात एकीकडे वाढ झाली असतानाच फसव्या लिकं व्हायरल करुन फसवणुक करण्याचे प्रकार देखील वाढू लागले आहेत.

नवी मुंबई : कोरोना विषाणू आणि त्याची लोकांमध्ये वाढत असलेली भीती याचा अनेकजण गैरफायदा घेताना दिसत आहेत. घरात बसून असलेल्या लोकांकडून इंटरनेटच्या वापरात एकीकडे वाढ झाली असतानाच फसव्या लिकं व्हायरल करुन फसवणुक करण्याचे प्रकार देखील वाढू लागले आहेत. त्यामुळे नागरिकांनी अशा अफवांपासून सावध राहण्याचे आवाहन नवी मुंबई पोलिसांकडून करण्यात आले आहे. 

ही बातमी वाचली का? फिलिपिन्सच्या 10 नागरिकांनी वाढवला नवी मुंबईचा ताप! वाचा सविस्तर...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागु करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आणि संचारबंदीमुळे अनेकजण घरात बसूनच काम करीत आहेत. त्यामुळे नागरिकाच्या इंटरनेटच्या वापरात प्रचंड वाढ झाली आहे. हीच संधी साधून काही टोळ्यांनी फसव्या लिंक पाठवून फसवणुकीचे प्रकार सुरु केले आहेत. सध्या प्रधानमंत्री बेरोजगार भत्ता योजना-2020 मध्ये नोंदणी करुन महिन्याला 3500 रुपये देण्यात येत असल्याचे अमिष दाखविणारी, तसेच नेटफ्लिक्सची लिंक 20 लोकांना किंवा 5 ग्रुपवर पाठविल्यास फ्रि नेटफ्लिक्स मिळेल, अशा प्रकारचे अमिष दाखविणाऱ्या लिंक्स व्हायरल होत आहेत. त्याशिवाय काही मोबाईल कंपन्यांकडून मोफत रिचार्ज दिले जात असल्याचाही संदेश चर्चेचा विषय बनत असल्याचे गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त प्रविण पाटील यांनी सांगितले.  

ही बातमी वाचली का? घर खर्चासाठी पत्नीचे दागिने ठेवले गहाण

काही टोळ्यांकडून नागरीकांना त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधुन त्यांच्या ईएमआयची तारीख वाढवून देण्याचे अमिष दाखविण्यात येत आहेत. तसेच त्यांच्या मोबाईलवर आलेला ओटीपी शेअर करण्यास सांगुन त्यांच्या बँक खात्यातून परस्पर रक्कम काढली जात आहे. 

ही बातमी वाचली का? फळांच्या राजालाही कोरोनाचा फटका

अशी घ्या काळजी
फसव्या लिंक ओपन करु नये. मोबाईलवर आलेला ओटीपी शेअर न करणे. नये. अनोळखी अप डाउनलोड करु नये. वेगवेगळया वेब पेजचा वापर टाळावा. संशयीत लिंक बाबत www.reportphishing.in  व www.cybercrime.gov.in वर तक्रार करण्याचे आवाहन नवी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलच्या वतीने उपआयुक्त प्रविण पाटील यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beware of fraudulent links during lockdown