Coronavirus: पुण्यात रुग्णांची संख्या 39; आठ जण बरे होऊन घरी परतले 

corona
corona

पुणे - पुण्यात कोरोनाचा संसर्ग झालेले आणखी चार रुग्ण बुधवारी आढळले. त्यामुळे पुण्यातील रुग्णांची संख्या 39 झाली आहे. त्यापैकी कोरोनामुक्त झालेल्या आठ जणांना विलगीकरण कक्षातून घरी सोडण्यात आले, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागतर्फे देण्यात आली. 

पुण्यात नव्याने आढळलेला चार रुग्णांपैकी एका रुग्णाने खासगी प्रयोगशाळेत नमुन्यांची तपासणी केली होती. त्यात कोरोनाचे निदान झाल्याने तो रुग्ण विलगीकरणासाठी डॉ. नायडू रुग्णालयात दाखल झाला. यापूर्वी कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णाच्या संपर्कातील नातेवाईकांचा प्रयोगशाळा अहवाल पॉझिटिव्ह आला. दुबई येथून आलेला रुग्णही कोरोनाबाधीत असल्याचे निदान झाले. त्यामुळे या तीनही रुग्णांना विलगिकरण करून ठेवले आहे. चौथ्या रुग्णाला लष्कराच्या वैद्यकीय महाविद्यालयातील (एएफएमसी) विलगिकरण कक्षात दाखल केले असल्याची माहिती विभागाने दिली. 

पुण्यात राज्यातील पहिला रुग्ण 9 मार्च रोजी पुण्यात आढळला. त्यानंतर आतापर्यंत शहरातील 32 आणि ग्रामीण भागातील सात अशा 39 रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यांना महापालिकेच्या नायडू रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. तेथेच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

विलगीकरण कक्षात 1025 जणांवर उपचार  
आतापर्यंत एक हजार 25 रुग्णांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. या सर्वांचे नमूने तपासण्यासाठी प्रयोगशाळेत तपासण्यासाठी पाठविले होते. त्यातील 917 रुग्णांचे नमुने निगेटीव्ह आले. 69 नमुन्यांचा अहवाल अद्यापही प्रतीक्षेत आहे. पुण्यातील एका रुग्णावर अतीदक्षता विभागात उपचार सुरू आहे. इतर रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना कोणताही धोका नाही, असेही विभागातर्फे सांगण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com