coronavirus: कोरोनासह इतर आजारांनी 78 टक्के रुग्णांचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 April 2020

कोरोनाबरोबरच मधुमेह,उच्च रक्तदाब तसेच इतर आजार असल्याने 78 टक्के रुग्णांचा मृत्यू झाल्याचे विश्‍लेषण राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे करण्यात आले.

पुणे - कोरोनाबरोबरच मधुमेह, उच्च रक्तदाब तसेच इतर आजार असल्याने 78 टक्के रुग्णांचा मृत्यू झाल्याचे विश्‍लेषण राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे करण्यात आले. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यात रविवारपर्यंत 45 जणांचा मृत्यू झाला. त्याचे विश्‍लेषणातून हा निष्कर्ष निघाला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांमध्ये 73 टक्के पुरूष असून, 27 टक्के महिला आहेत. 

मोठी बातमी : मख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दारावर कोरोनाची धडक

कोरोनामुळे 45 वर्षांच्या खालील एका रुग्णाचा मृत्यू झाला असून, 60 टक्के मृत रुग्णांचे वय 61 वर्षांपेक्षा कमी होते. राज्यात मृत्युमूखी पडलेल्या 45 पैकी 78 टक्के रुग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाबाबरोबरच इतर गंभीर आजार होते. काही रुग्णांची शस्त्रक्रिया झाली होती, असेही या विश्‍लेषणातून पुढे आले आहे.त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि मधुमेह, उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांना विशेष काळजी घेण्याची आवश्‍यकता असल्याचेही यातून अधोरेखित होते. 

Coronavirus : महाराष्ट्रात २२ जिल्ह्यांत कोरोनाचा प्रभाव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 78 percent of patients died of other diseases