मोठी बातमी : मख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दारावर कोरोनाची धडक

मोठी बातमी : मख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दारावर कोरोनाची धडक

मुंबई - महाराष्ट्रात मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. महाराष्ट्राचे मुख्यामंत्री उद्धव ठाकरे यांचं खासगी निवासस्थान हे मुंबईतील वांद्रे भागात आहे. याच मुंबईतील वांद्रे भागात काही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सर्व अंगरक्षणाची आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. याचसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अंगरक्षक आणि कार्यालयीन कर्मचारी हे बदलले जाण्याची शक्यता आहे. मातोश्री परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. 

मुंबईतील वांद्रे भागातील मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री या खासगी निवासस्थान परिसरात तब्ब्ल १८० पोलिस आणि कर्मचारी कार्यरत असतात. अशात या मातोश्री परिसरात एका चहा विकणारा गृहस्थ होता. या चहावाल्याकडे अनेक पोलिस चहा प्यायला येत जात असे जात असतात. या चहा विकणाऱ्या गृहस्थाला कोरोनाची लागण झालाय. याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या सर्व अंगरक्षणाची आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. याचसोबत अंगरक्षक बदलले जाण्याची  शक्यता आहे.

मुख्यमंत्री हे कायम कार्यालयीन कर्मचारी आणि अंगरक्षणाच्या संपर्कात असतात. मुख्यमंत्र्यांना अनेक बैठका आणि विविध कामांसाठी मंत्रालयात ये जा करावी लागते. अशात त्यांचा संपर्क अनेक VVIP यांच्याशी येत असल्याने आता  मुख्यमंत्र्यांच्या सर्व अंगरक्षणाची आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. याचसोबत अंगरक्षक बदलले जाण्याची  शक्यता आहे.

body guards and office staff of maharashtra cm uddhav thackeray will be replaced due to corona threat

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com