Coronavirus : पिंपरीतील वायसीएममधील रुग्णवाहिका चालक, फोन अटेंडन्स मास्कविना

सकाळ वृत्तसेवा
Friday, 3 April 2020

महापालिकेच्या वायसीएम व भोसरी रुग्णालयात कोरोना पाॅझिटीव्ह व्यक्तींवर उपचार सुरू आहेत. अशा व्यक्तींसह संशयितांची ने-आण करण्यासाठी वायसीएमच्या रुग्णवाहिकांचा वापर केला जात आहे. परंतु, त्यांचे चालक व दूरध्वनी अटेंडन्स यांना मास्क, ग्लोज, सॅनिटायझर असे साहित्य मागणी करूनही पुरविले जात नसल्याची तक्रार त्यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

पिंपरी - महापालिकेच्या वायसीएम व भोसरी रुग्णालयात कोरोना पाॅझिटीव्ह व्यक्तींवर उपचार सुरू आहेत. अशा व्यक्तींसह संशयितांची ने-आण करण्यासाठी वायसीएमच्या रुग्णवाहिकांचा वापर केला जात आहे. परंतु, त्यांचे चालक व दूरध्वनी अटेंडन्स यांना मास्क, ग्लोज, सॅनिटायझर असे साहित्य मागणी करूनही पुरविले जात नसल्याची तक्रार त्यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

वायसीएमच्या रुग्णवाहिका विभागात २८ चालक व सहा दूरध्वनी अटेंडन्स कार्यरत आहेत. त्यांचे काम तीन पाळ्यांमध्ये सुरू आहे. शहरासह लगतच्या खेड, मावळ व मुळशी तालुक्यातील रुग्णांचीही त्यांना ने-आण करावी लागत आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर मास्क, ग्लोज व सॅनिटायझर पुरविण्याची मागणी त्यांनी वायसीएम प्रशासनाकडे चार दिवसांपुर्वी केली आहे. त्यांनी दखल न घेतल्याने मंगळवारी (ता. १) महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासह महापौर, पक्षनेते, विरोधी पक्ष नेते, कर्मचारी महासंघ यांच्याकडे तक्रार केली. शुक्रवार (ता. ३) पर्यंत त्यांची दखल घेतलेली नव्हती. दरम्यान, गुरुवारी एकदाच वापरण्यासाठीचे मास्क आम्हाला दिले होते. परंतु, एन-९५ प्रकारातील मास्क आम्हाला मिळावेत, असे एका रुग्णवाहिका चालकाने सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ambulance driver at YCM without a phone attendance mask