खासदार निधीतील रुग्णवाहिका ताब्यात घेण्यास सुरवात 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 14 April 2020

कोरोनामुळे शहरात सध्या रुग्णवाहिकांचा तुटवडा भासत आहे. सरकारच्या 108 या आरोग्य सेवेवर सध्या मोठा ताण आहे. कोरोनाच्या संशयित रुग्णांची वाहतूक 108 मधील रुग्णवाहिकेतून सध्या होत आहे. त्यामुळे अन्य आजारांच्या रुग्णांची गैरसोय होत आहे. म्हणून राज्य सरकारने अन्य रुग्णवाहिका ताब्यात घेऊन त्यातून कोरोनाच्या संशयित रुग्णांची वाहतूक करावी, असे आदेश सरकारने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

पुणे : खासदार निधीतून उपलब्ध झालेल्या रुग्णवाहिका ताब्यात घेण्यास जिल्हा प्रशासनाने सोमवारी सुरुवात केली. पुणे शहरात चोवीस रुग्णवाहिका जिल्हा प्रशासन ताब्यात घेणार आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनामुळे शहरात सध्या रुग्णवाहिकांचा तुटवडा भासत आहे. सरकारच्या 108 या आरोग्य सेवेवर सध्या मोठा ताण आहे. कोरोनाच्या संशयित रुग्णांची वाहतूक 108 मधील रुग्णवाहिकेतून सध्या होत आहे. त्यामुळे अन्य आजारांच्या रुग्णांची गैरसोय होत आहे. म्हणून राज्य सरकारने अन्य रुग्णवाहिका ताब्यात घेऊन त्यातून कोरोनाच्या संशयित रुग्णांची वाहतूक करावी, असे आदेश सरकारने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.  तसेच खासदार निधीतून उपलब्ध झालेल्या रुग्णवाहिका ताब्यात घेण्यासाठी ही सांगितले आहे. पुण्यामध्ये आतापर्यंत खासदार निधीतून 24 रुग्णवाहिकांचे वाटप झाले आहे. त्यातील 12 रुग्णवाहिका ताब्यात घेण्यात आल्याची माहिती तहसीलदार विवेक जाधव यांनी दिली 

गॅस सिलिंडरची घ्या काळजी;उन्हाळ्यातील वाढती उष्णता ठरतेय स्फोटांचे कारण 

उर्वरित 12 रुग्णवाहिका ही येत्या एक किंवा दोन दिवसांमध्ये ताब्यात घेण्यात येतील असे त्यांनी स्पष्ट केले. या रुग्णवाहिका किती काळासाठी जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतले आहे हे अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही. आमदार, खासदार निधीतून उपलब्ध झालेल्या रुग्णवाहिका जिल्हा प्रशासनाने ताब्यात घ्याव्यात, अशी मागणी शहरातील माहिती अधिकार क्षेत्रातील कार्यकर्ते नंदकुमार गोसावी तसेच विवेक वेलणकर, उदय जगताप यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे नुकतीच केली होती.  त्या बाबतचे वृत्त सकाळमध्ये प्रसिद्ध झाले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The ambulance from the MP funds are stated to acquired