esakal | Coronavirus : पिंपरीमध्ये निजामुद्दीन प्रकरणातील आणखी एक पॉझिटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

Corona-Virus

दृष्टिक्षेपात
एकूण दाखल : ३९६
एकूण नमुने : ३९२
निगेटिव्ह : ३२९
प्रलंबित : ४८
पाॅझिटीव्ह : १५
घरी सोडले : ११
उपचार सुरू : ४
होम क्वारनटाइन : १६६९

Coronavirus : पिंपरीमध्ये निजामुद्दीन प्रकरणातील आणखी एक पॉझिटिव्ह

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

शहरातील १५ पैकी बरे झालेल्या ११ व्यक्तींना सोडले घरी
पिंपरी - दिल्लीतील निजामुद्दीन भागात झालेल्या धार्मिक कार्यक्रमाच्या हाय रिस्क काॅन्टॅक्टमधील आणखी एका व्यक्तीचा एनआयव्ही कडील अहवाल पाॅझिटीव्ह आला. त्यामुळे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या १५ झाली आहे. मात्र, यापुर्वी दाखल एका व्यक्तीचा १४ दिवसांच्या उपचारानंतरचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना शुक्रवारी घरी सोडण्यात आले.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

निजामुद्दीन येथील कार्यक्रमाला पिंपरी-चिंचवडमधील 23 नागरिक सहभागी झाले होते. त्यांच्या संपर्कात आलेल्या पाच जणांसह 28 जणांच्या घशातील द्रावाचे नमुने बुधवारी पुण्यातील एनआयव्हीकडे तपासण्यात आले. त्यातील दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्या एका व्यक्तीचा अहवाल आज पाॅझिटीव्ह आला.

आणखी एक व्यक्ती बरी 
पिंपरी-चिंचवडमधील 12 जण सुरुवातीला पॉझिटिव्ह आढळले होते. त्यांच्यावर वायसीएम व भोसरी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यातील बरे झालेल्या दहा जणांना यापुर्वीच घरी सोडले आहे. शुक्रवारी (ता. ३) आणखी एकाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांनाही घरी सोडण्यात आले. आता त्यातील केवळ एकाच व्यक्तीवर उपचार सुरू आहेत. मात्र, निजामुद्दीन प्रकरणातील तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने उपचार सुरू असलेल्यांची संख्या चार आहे. दरम्यान, घरी सोडलेल्या ११ जणांना १४ दिवस होम क्वारनटाइनची सूचना प्रशासनाने केली आहे.

loading image