रिक्षाचालकांनी राज्य शासनाकडे केल्या विविध मागण्या

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 28 March 2020

कोरोनाच्या संकटामुळे हातावरचे पोट असलेल्या रिक्षाचालकांनीही राज्य शासनाकडे विविध मागण्या केल्या

बारामती : कोरोनाच्या संकटामुळे हातावरचे पोट असलेल्या रिक्षाचालकांनीही राज्य शासनाकडे विविध मागण्या केल्या असून, तशा आशयाचे निवेदन त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठविले आहे. बारामती व इंदापूरमधील ऱिक्षाचालकांच्या वतीने ही मागणी पवार यांच्याकडे करण्यात आली आहे. 

बारामती, इंदापूरसह राज्यातील रिक्षाचालकांचा व्यवसाय कोरोनाच्या संकटामुळे ठप्प झाला आहे. या पार्श्वभूमीवर रिक्षाचालकांपुढे अनेक प्रश्न निर्माण झाले असून, यातून मार्ग काढण्यासाठी सरकारने पावले उचलावीत अशी मागणी रिक्षा चालकांनी केली आहे. 

रिक्षाचालकांच्या खात्यात सरकारने काही रक्कम तातडीने जमा करावी, रिक्षा चालकांच्या मुलांच्या शिक्षणाचा पुढील तीन वर्षांचा शैक्षणिक खर्च सरकारने उचलावा, रिक्षा चालकांसाठी आरटीओ पासिंग तसे विमा सुविधा मोफत द्यावी, रिक्षावरील कर्ज माफ करावे व इतरही सुविधा रिक्षा चालकांना द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Auto Drivers Various Demand to State Government