Coronavirus : कोरोना विरुद्ध डॉक्‍टरांना "बीसीजी'चे कवच

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 28 April 2020

कोविड-19च्या संक्रमनाचा सर्वात जास्त धोका वैद्यकीय कर्मचारी, डॉक्‍टर आणि वयोवृद्ध व्यक्तींना असतो. अशा महत्त्वपूर्ण लोकांच्या वैद्यकीय सुरक्षेसाठी क्षय रोगांसाठी वापरण्यात येणाऱ्या सुधारीत बीसीजी लसीची वैद्यकीय चाचणी घेण्याची परवानगी जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे. बीसीजीचे (रिकॉंम्बिनंट) कोविड-19 वरील परिणाम अभ्यासण्यासाठी देशातही चाचण्या घेण्यात येणार आहे, अशी माहिती हेलींग हॅंड्‌स क्‍लिनिकचे संस्थापक आणि संशोधक डॉ. अश्‍विन पोरवाल यांनी दिली.

पुणे - कोविड-19च्या संक्रमनाचा सर्वात जास्त धोका वैद्यकीय कर्मचारी, डॉक्‍टर आणि वयोवृद्ध व्यक्तींना असतो. अशा महत्त्वपूर्ण लोकांच्या वैद्यकीय सुरक्षेसाठी क्षय रोगांसाठी वापरण्यात येणाऱ्या सुधारीत बीसीजी लसीची वैद्यकीय चाचणी घेण्याची परवानगी जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे. बीसीजीचे (रिकॉंम्बिनंट) कोविड-19 वरील परिणाम अभ्यासण्यासाठी देशातही चाचण्या घेण्यात येणार आहे, अशी माहिती हेलींग हॅंड्‌स क्‍लिनिकचे संस्थापक आणि संशोधक डॉ. अश्‍विन पोरवाल यांनी दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पोरवाल म्हणाले, 'कोविडच्या वाढत्या रुग्णसंख्येबरोबरच वैद्यकीय कर्मचाऱ्यांची घटत जाणारी संख्या निश्‍चितच धोकादायक आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यासाठी जर्मनीतील मॅक्‍स प्लॅंक इंन्स्टिट्यट शास्त्रज्ञ आणि व्हीपीएन जर्मनीचे व्यवस्थापकीय संचालक यांच्याशी चर्चा केली. व्हीपीएम 1002 या लसीवर हे संशोधक काम करत आहे.'' कोविड-19 वर प्रत्यक्ष लस यायला अजून काही महिने लागतील पण त्याआधी वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह ज्येष्ठांचे संरक्षण करणाऱ्या या लसीवर तातडीने संशोधन होणे गरजेचे आहे. 

"बीसीजी'चे वैशिष्ट्ये - 
- क्षयरोगाचा प्रसार रोखते 
- क्षयरोग वगळता इतर संसर्गजन्य आजारांसाठी वापर 
- प्रतिकारशक्ती वाढवणे आणि संसर्गरोधक म्हणून कार्यक्षम 
- जन्मतःच मुलांची प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी ही लस दिली जाते 
- मोठ्या प्रमाणावर उत्पादन शक्‍य 

बीसीजीते फायदे -
- "आरएनए' पसूान विकसित विषाणूसाठी प्रभावी 
- संसर्गजन्य आजारांत मृत्यूचे प्रमाण घटते, प्राण्यांवरील चाचणीतून सिद्ध 
- लहान मुलांमधील श्‍वसन संस्थेशी निगडित संसर्गाला पायबंद करते 
- इननेट इम्युनो रिस्पॉन्स वाढवते 

काय आहे पथदर्शी प्रकल्प 
- बीसीजीचे (रिकॉंम्बिनंट) लसीची कोविड-19 विरुद्धची कार्यक्षमता तपासणार 
- विकेंद्रीत, यादृच्छिक, गट पद्धतीने वैद्यकीय चाचण्या घेण्यात येणार 
- सर्वाधिक धोका असलेले ज्येष्ठ नागरिक आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी होणार वैद्यकीय चाचण्या 

बीसीजीचे लसीकरण केलेले आणि न केलेल्या देशांमधील कोविड-19 बाधित रुग्णांसंबंधी संशोधन करण्यात आले आहे. प्रकाशनपूर्व असलेले हे शोधनिबंध बीसीजीचे लसीकरण कोरोनाचा प्रभाव कमी करत असल्याचे सूचीत करतात. 
- डॉ. अश्‍विन पोरवाल, संस्थापक, हेलींग हॅंड्‌स क्‍लिनिक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BCG shields doctors against Corona