Coronavirus : भोसरी, दिघी परिसरात कडक संचारबंदी लागू

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 11 April 2020

पिंपरी-चिंचवड महापालिकेने भोसरी, दिघी परिसरातील काही भाग सील केल्याने परिसरात शुकशुकात होता. महापालिका आणि भोसरी, दिघी पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी यांनी शुक्रवारी (ता. १०) रात्री साडे अकरा पर्यंत पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. त्याचप्रमाणे महापालिकेद्वारे सील केलेल्या भागात प्रतिबंधीत क्षेत्र असल्याचे फ्लेक्स लावून नागरिकांमध्ये जनजागृती केली.

भोसरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेने भोसरी, दिघी परिसरातील काही भाग सील केल्याने परिसरात शुकशुकात होता. महापालिका आणि भोसरी, दिघी पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी यांनी शुक्रवारी (ता. १०) रात्री साडे अकरा पर्यंत पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. त्याचप्रमाणे महापालिकेद्वारे सील केलेल्या भागात प्रतिबंधीत क्षेत्र असल्याचे फ्लेक्स लावून नागरिकांमध्ये जनजागृती केली. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भोसरी, दिघी परिसरात शुक्रवारपासून (ता. १०) ते रविवारपर्यंत (ता. १२) कडक संचारबंदी लागू केली आहे.  दुसऱ्या दिवशीही या संचारबंदीचे काटोकोरपणे नियोजन पोलिसांनी केल्यामुळे आणि त्यांना नारिकांचाही प्रतिसाद मिळाल्यामुळे परिसरात शुकशुकाट होता. शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत महापालिकेद्वारे 'कोरोना कोवीड १९ प्रतिबंधीत क्षेत्र, प्रवेश निशिद्ध' अशा अशयाचे फ्लेक्स सील केलेल्या भागात लावण्यात आले होते. 

महापालिकेद्वारे भोसरीतील  पीसीएमटीचौक, जनाई हाईट्स, भोसरी गावठाण  त्याचप्रमाणे दिघीतील स्काइलाइन सोसायटी, बीयू भंडारी,  रोडे हाॅस्पिटल आदी भागातील रस्ते पाच ठिकाणी बॅरेकेट्स टाकून बंद करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंता संजय घुबे यांनी दिली.  त्याचप्रमाणे भोसरी आणि दिघीतील काही रस्ते नागरिकांनीही अडथळे उभारुन स्वतःहून बंद केले आहेत. त्यामुळे भोसरी, दिघी परिसरात सलग दुसऱ्या दिवशी शुकशुकाट होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Bhosari Dighi area strict communication block is applicable