Coronavirus : सोशल डिस्टन्सिंगबाबत काळजी घेत किराणामालच्या खरेदीसाठी दुकानांसमोर मोठी गर्दी

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 11 April 2020

लॉकडाउनमध्ये वाढ झाल्यास गैरसोय होऊ नये, यासाठी नागरिकांनी सकाळपासूनच धान्य आणि किराणामालच्या खरेदीसाठी दुकानांसमोर मोठी गर्दी केली होती. शहरातील पिंपरी, चिंचवड, काळेवाडी, डांगे चौक या परिसरात असणारी स्वस्त धान्याची दुकाने आणि मॉलच्या भागात सकाळी आठ वाजल्यापासूनच नागरिकांनी रांगा लावल्या होता.

पिंपरी - लॉकडाउनमध्ये वाढ झाल्यास गैरसोय होऊ नये, यासाठी नागरिकांनी सकाळपासूनच धान्य आणि किराणामालच्या खरेदीसाठी दुकानांसमोर मोठी गर्दी केली होती. शहरातील पिंपरी, चिंचवड, काळेवाडी, डांगे चौक या परिसरात असणारी स्वस्त धान्याची दुकाने आणि मॉलच्या भागात सकाळी आठ वाजल्यापासूनच नागरिकांनी रांगा लावल्या होता. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अनेक ठिकाणी दुकानदारांनी सोशल डिस्टन्सिंगबाबत काळजी घेतली होती. सकाळी दहा वाजेनंतर उन्हाचा कडाका वाढल्यानंतरही नागरिक रांगेत उभे होते. 

‘आधार’ जोडणी नसलेल्यांनाही धान्य 
शिधापत्रिका आधारकार्डाला जोडणे आवश्‍यक आहे. मात्र, केशरी कार्डधारकांनी आधारची जोडणी केली नसेल, तर त्यांनी त्याची प्रत दुकानदाराकडे सादर करावी लागणार आहे. यासंदर्भातील अध्यादेश राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आला आहे. २५ एप्रिलनंतर त्यांना संबधित दुकांनामधे धान्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

पुरेशा प्रमाणात साठा 
शहरातील नागरिकांना पुरवठा करता येईल, एवढा साठा किराणा दुकानदारांकडे उपलब्ध आहे. घाउक बाजारातून अन्नधान्याची ने-आण करण्यास परवानगी असल्यामुळे नागरिकांना पुरेशा प्रमाणात किराणा माल उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी दुकानांमध्ये गर्दी करु नये, असे आवाहन किराणा दुकानदारांकडून करण्यात आले आहे. 

दरम्यान, पुण्यामध्ये कर्फ्यू लागू असल्यामुळे नागरिकांना खरेदीसाठी सकाळी सात ते दुपारी बारापर्यंतची वेळ निश्‍चित करण्यात आली आहे. तशा प्रकारचे निर्बंध अद्याप पिंपरी-चिंचवडमध्ये लागू झालेले नाहीत. त्यामुळे नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Big crowd in front of shops for groceries worrying about social distancing

Tags
टॉपिकस
Topic Tags: