Coronavirus : आजपासून भोर-वेल्ह्याच्या सीमा बंद  

विजय जाधव
Tuesday, 14 April 2020

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी भोर व वेल्हे तालुक्याच्या सीमा मंगळवार (ता.१४) रात्रीपासून बंद करण्यात येणार असल्याची माहिती प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी दिली. लॉ़कडाऊनच्या काळातही पुण्या-मुंबईसारख्या इतर शहरातून तालुक्यात येणाऱ्यांची संख्या कमी होत नाही. याशिवाय तालुक्यातील अनेक जण अत्यावश्यक सेवांच्या नावाखाली पुण्याकडे जाऊ लागले आहेत. त्यामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला असून, पोलिसांना त्याबाबत सूचनाही देण्यात आल्या आहेत.

भोर (पुणे) - कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी भोर व वेल्हे तालुक्याच्या सीमा मंगळवार (ता.१४) रात्रीपासून बंद करण्यात येणार असल्याची माहिती प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी दिली. लॉ़कडाऊनच्या काळातही पुण्या-मुंबईसारख्या इतर शहरातून तालुक्यात येणाऱ्यांची संख्या कमी होत नाही. याशिवाय तालुक्यातील अनेक जण अत्यावश्यक सेवांच्या नावाखाली पुण्याकडे जाऊ लागले आहेत. त्यामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला असून, पोलिसांना त्याबाबत सूचनाही देण्यात आल्या आहेत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

लॉकडाऊन झाल्यापासून भोर तालुक्यात २२ हजार तर वेल्हे तालुक्यात १५ जण बाहेरून आलेले आहेत. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासन रात्रदिवस काम करीत आहे. मात्र बाहेरुन येणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे तालुक्याच्या सीमा बंद करण्याचा कठोर निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे ३ मेपर्यंत तालुक्यातून कोणीही बाहेर जाऊ शकणार नाही आणि कोणीही बाहेरून येणार नाही. अत्यावश्यक वैद्यकीय सेवेची खात्री झाल्यावरच संबंधित व्यक्तीला जाण्यासाठी परवानगी दिली जाणार आहे. 

अत्यावश्यक सेवांसाठी ग्रामदूताचे सहाकार्य घ्यावे - तहसीलदार अजित पाटील
अत्यावश्यक सेवा पुरविण्यासाठी प्रत्येक गावांमध्ये एका ग्रामदूताची नेमणूक करण्यात आली आहे. नागरिकांनी घराबाहेर न पडता ग्रामदूताशी संपर्क साधून त्याच्याकडे हव्या असलेल्या साहित्याची किंवा औषधांची यादी द्यावी. संबंधित ग्रामदूत भोर शहरात किंवा मंडलाच्या प्रमुख गावी जाऊन गावातील नागरिकांना हवे असलेले साहित्य गावात आणून देईल. ग्रामदूत हे स्वेच्छेने विनामोबदला काम करण्यास तयार झालेले आहेत. त्यामुळे त्यांचे आवश्यक वेळीच सहकार्य घ्यावे असे आवाहन तहसीलदार अजित पाटील यांनी केले आहे. ग्रामदूताचा क्रमांक ग्रामपंचायतीमध्ये उपलब्ध करण्यात आलेला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Boundaries Seal of Bhor and Velha