धक्कादायक: कोरोनाच्या गडबडीत ससून हॉस्पिटलच्या प्रमुखांची तडकाफडकी बदली

टीम ई-सकाळ
Thursday, 16 April 2020

कोरोनाच्या रुग्णांची संख्या शहरात झपाट्याने वाढत असतानाच डॉ. चंदनवाले यांच्या बदलीचा फतवा सरकारने काढला आहे.

पुणे Coronavirus : पुण्यात कोरोना विषाणूंचा उद्रेक सुरू असतानाच बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. तर, कोरोनामुळे उद्‌भवलेल्या परिस्थीतीच्या अनुशंगाने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून रुग्णालयाची उपाययोजनेचे अधिकार विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांना दिले आहेत.

पुण्याच्या आणखी बातम्यांसाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाच्या रुग्णांची संख्या शहरात झपाट्याने वाढत असतानाच डॉ. चंदनवाले यांच्या बदलीचा फतवा सरकारने काढला आहे. त्यांच्याकडे मुंबईमधील वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाच्या सहसंचालक पदाचा कार्यभार सोपविण्यात आला असल्याचे आदेश गुरुवारी संध्याकाळी काढण्यात आला. या आदेशाची तातडीने अंमलबजाणी करावी, असेही पत्रात म्हटले आहे.

पुण्याच्या आणखी बातम्यांसाठी येथे ► क्लिक करा

सध्याच्या परिस्थितीत ससूनच्या डीनची तडकाफडकी बदली होणे धक्कादायक आहे. त्यामागची कारणे ही तितकीच गंभीर असल्याचे बोलले जात आहे. डॉ. चंदनवाले यांच्या कार्यपद्धती विषयी अनेकांनी आक्षेप घेतले होते. ससून रुग्णालय हे सर्वसामान्य, गरीब रुग्णांचे आशास्थान आहे. ससून रुग्णालय अधिक कार्यक्षम होणं  हे अत्यंत गरजेचं आहे. तिथं जर अधिकारी मनमानी करत असतील तर त्यांना बदलणे क्रमप्राप्त होते, अशी चर्चा आता वैद्यकीय क्षेत्रात सुरू झाली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus b j medical college dean dr. ajay chandanwale transfer