कोरोना हवेतून पसरत नाही;  जागतिक आरोग्य संघटनेचा निष्कर्ष 

टीम ई-सकाळ
Friday, 3 April 2020

डब्ल्यूएचओच्या प्रकाशीत लेखात म्हटले आहे, की कोरोनाच्या विषाणूचे संक्रमण हे श्वसनातून होते.

बीजिंग Coronavirus : कोरोनाची लागण प्रामुख्याने श्वसनमार्गाद्वारे आलेल्या थुंकीतून (शिंक अथवा खोकल्याचे थेंब) आणि नजीकच्या संपर्कांद्वारे होते. हा विषाणू हवेत जास्त काळ राहू शकत नाही असे जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) नुकत्याच प्रकाशीत झालेल्या एका लेखात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळं सोशल डिस्टंसिंग हा सगळ्यांत मोठा उपाय असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखीत झालंय.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तर तुम्हाला जास्त धोका!
डब्ल्यूएचओच्या प्रकाशीत लेखात म्हटले आहे, की कोरोनाच्या विषाणूचे संक्रमण हे श्वसनातून होते. जर एखादा संक्रमित व्यक्तीच्या तुम्ही नजीकच्या संपर्कात (एका मीटरच्या आत) असाल आणि तो तुमच्यासमोर खोकला किंवा शिंकला आणि त्याच्या श्वासातून बाहेर पडलेले थुंकीचे थेंब तुमच्या अंगावर पडले तर, तुम्हाला कोरोनाचा जास्त धोका संभवतो. हे संसर्गजन्य थेंब सामान्यत: ५ ते १० मायक्रॉन आकाराचे असतात ते या थुंकीतून आल्यानंतर आपल्या शरीरात पसरतात आणि आपल्याला संक्रमित करतात. त्याचबरोबर संक्रमित व्यक्तीच्या आसपासच्या वातावरणात पृष्ठभागावर किंवा वस्तूंना स्पर्श केल्यास देखील संक्रमण उद्भवू शकते, असे चीनच्या राज्य सरकारी संस्था चाइना डेलीने डब्ल्यूएचओच्या प्रकाशनाला सांगितल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. तसेच हवेद्वारे होणारे संक्रमण होणारे विषाणू हे श्वसनाद्वारे संक्रमित होणाऱ्या विषाणूंपेक्षा वेगळे असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले आहे. कारण काही कोरोनाचे विषाणू हे ५ मायक्रॉन पेक्षा कमी असून, ते हवेत जास्त काळ जिवंत राहू शकतात आणि १ मीटरपेक्षा अधिक अंतरापर्यंत जाऊ शकतात असे या लेखात सांगितले आहे. लेखातील माहितीनुसार, चीनमधील कोरोना विषाणूच्या ७५ हजार ४६५ रुग्णांच्या विश्लेषणामध्ये हवेद्वारे प्रसारित झाल्याने कोरानाची लागण झाल्याची कोणतीही घटना समोर आली नाही. 

आणखी वाचा - पुणे विभागातील रुग्णांच्या संख्येत वाढ

आखाती देशांना सूचना
सध्या जगभरात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं असलं तरी, कोरोनाची तीव्रता, युरोप, अमेरिका, आशिया खंडात अधिक आहे. पण, आखाती देशांमध्ये तुलनेत कमी रुग्ण आहेत. पण, आखाती देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढण्याचा वेग चिंताजनक आहे. सध्या आखाती देशांमध्ये 60 हजार रुग्ण असले तरी, गेल्या आठवड्याच्या तुलनेत रुग्णांची संख्या दुपटीने वाढली आहे. एका आठवड्यात अशापद्धतीन दुपटीने रुग्ण वाढण्याचा प्रकार चिंताजनक असल्यामुळं जागतिक आरोग्य संघटनेने आखाती देशांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. सध्या इराणच्या बाहेर 50 हजार नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus does not spread with air world health organisation report