Coronavirus : पिरंगुटमधील कोरोनाबाधित रुग्ण बरा होऊन घरी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 17 April 2020

पिरंगुट (ता.मुळशी ) येथील कोरोना संशयित रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने संबंधित रुग्णाला गुरुवारी नायडू हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले आहे.

पिरंगुट : पिरंगुट (ता.मुळशी ) येथील कोरोना संशयित रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने संबंधित रुग्णाला गुरुवारी नायडू हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले आहे. या रुग्णाच्या संपर्कात आलेले सर्वजण निरोगी असून, त्यांना कोणतीही बाधा झालेली नाही.

रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सतरा जणांवर आरोग्य विभाग लक्ष ठेवून होता. त्यापैकी कोणामध्येही कोरोणाची लक्षणे आढळून आलेली नाहीत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अजित कारंजकर यांनी दिली. मात्र, अद्याप लॉकडाऊन चालू असल्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार अभय चव्हाण व पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus Infected Patient Now Free From Corona