Video : महाराष्ट्र सरकारने ऐकावी दिल्लीत अडकलेल्या विद्यार्थ्यांची हाक

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 28 April 2020

स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी दिल्लीत गेलेले जवळपास साडे आठशेहुन अधिक विद्यार्थी राज्यात परतण्यासाठी धडपड करीत आहेत. त्यांनी अनेक राजकीय नेत्यांशी संपर्क साधला, परंतु अजूनही त्यांची घरी येण्याची व्यवस्था झाली नसल्याने विद्यार्थी हवालदिल झाले आहेत, तर त्यांचे कुटुंबिय त्यांच्या वाटेकडे अक्षरशः डोळे लावून बसले आहेत.

पुणे - स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी दिल्लीत गेलेले जवळपास साडे आठशेहुन अधिक विद्यार्थी राज्यात परतण्यासाठी धडपड करीत आहेत. त्यांनी अनेक राजकीय नेत्यांशी संपर्क साधला, परंतु अजूनही त्यांची घरी येण्याची व्यवस्था झाली नसल्याने विद्यार्थी हवालदिल झाले आहेत, तर त्यांचे कुटुंबिय त्यांच्या वाटेकडे अक्षरशः डोळे लावून बसले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परीक्षेची तयारी करण्यासाठी देशभरातील लाखो विद्यार्थी दिल्ली गाठतात. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील देखील हजारो विद्यार्थी दिल्लीत जातात. सध्या लॉकडाऊनमुळे जवळपास आठशेहुन अधिक विद्यार्थी तेथे अडकले आहेत. कोटा येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांबरोबरच दिल्लीतील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्यात आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी विद्यार्थीकडून होत आहे. यासंदर्भात विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री कार्यालयात कळविले आहे. त्याची पोचही मिळाली आहे. मात्र अद्याप अडकलेल्या विद्यार्थ्यांना सोडविण्यासाठी राज्य सरकारने हालचाली केलेल्या नाहीत. त्यामुळे संबंधित विद्यार्थी घरी परतण्याच्या वाटेकडे डोळे लावून बसलेले आहेत.

अरे बापरे ! चक्क त्यांनी यासाठी टेरेस घेतलेत भाड्याने 

पुण्यातील राजेश बोनवटे म्हणाले,"एखादी सदनिका भाडयाने घेऊन चार-पाच विद्यार्थी दिल्लीत एकत्र राहतात. प्रत्येकी जवळपास ७ ते ८ हजार घरभाडे द्यावे लागते. पण सध्या खिसा रिकामा असल्याने घरभाडे देणे अशक्य आहे. सध्या 'बार्टी' आणि 'सारथी'मार्फत येणारे अनुदानही ठप्प आहे. परिणामी विद्यार्थ्यांना सध्या हाती असलेल्या पैशांवर भागवावे लागत आहे.

तसेच आम्ही राहत असलेल्या परिसरात काही कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे विद्यार्थी धास्तावले आहेत. आम्ही दिल्लीत असलेल्या राज्यातील जवळपास साडे आठशेहुन आधिक विद्यार्थ्यांची यादी तयार केली आहे."

दिल्लीत सध्या असलेले राज्यातील विद्यार्थी -

 • 'बार्टी'चे अनुदान मिळणारे : १२८
 • 'सारथी'च्या अनुदान मिळणारे : १२२
 • अन्य : ६००हून अधिक

विद्यार्थ्यांच्या समस्या

 • सुरक्षित जेवण उपलब्ध न होणे
 • पुरेसे पैसे जवळ नसणे
 • घरभाडे भरण्यासाठी दबाव
 • आजुबाजुला कोरोनाचा फैलाव असल्याने आरोग्य धोक्यात

या भागात आहेत सर्वाधिक विद्यार्थी 

 • ओल्ड राजेंद्रनगर
 • शालीमार पॅलेस
 • कोरोल बाग
 • मुखर्जीनगर
 • हैदरपूर

"मित्र-मैत्रिणींनी आर्थिक मदत केल्याने दिल्लीत फेब्रुवारीमध्ये आले. परंतु राज्यातील लॉकडाऊनमुळे वडिलांचा पगार कापून येत आहे. तो घर खर्चासाठी अपुरा पडत असल्याने ते पैसे पाठवू शकत नाहीत. तसेच दिल्लीत अभ्यासासाठी सहकार्य करणाऱ्या मित्र-मैत्रिणींचा पगारात सध्या कपात होत आहे. त्यामुळे मला कोणीही मदत पाठवू शकत नाही. परिणामी तेथील घरभाडे देणे शक्य होत नाही."
- शिवानी इंगोले, हिंगोली

'काहीजणांना जेवण बनविता येत नाही. बाहेर जेवणाची पाकिटे मिळत आहेत. परंतु ते अन्न सुरक्षित असले का, हा प्रश्न पडत आहे. त्याशिवाय राज्यातील विद्यार्थी राहतात, त्या परिसरातील बहुतांश इमारती सील केल्या आहेत. आसपास कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत, त्यामुळे भीती वाटत आहे.
- स्नेहल चव्हाण, पिंपोड बुद्रुक (सातारा)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus maharashtra students delhi lock down