राज्यातील मृतांची संख्या 232वर; मुंबईच चिंतेचा विषय

टीम ई-सकाळ
Tuesday, 21 April 2020

राज्यातील २३३६ रुग्णांपैकी १८९० रुग्ण हे लक्षणविरहित आहेत.

मुंबई/पुणे Coronavirus : राज्यात गेल्या चोवीस तासात ४६६ नवीन रुग्णांची नोंद झाल्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या ४६६६ झाली आहे. चोवीस तासात ९ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी मुंबईतील सात जण तर मालेगावच्या दोघांचा समावेश आहे. आजपर्यंत राज्यातून ५७२ रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अनेकांना लक्षणचं नाहीत
कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २३२ झाली आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७६,०९२ नमुन्यांपैकी ७१,६११ जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत तर ४६६६ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यातील २३३६ रुग्णांपैकी १८९० रुग्ण हे लक्षणविरहित आहेत तर, ३९३ रुग्णांना रुग्णांना लक्षणे होती. या रुग्णांपैकी ५३ रुग्ण हे अतिदक्षता विभागात आहेत. आज झालेल्या ९ मृत्यूंपैकी ६ पुरुष तर ३ महिला आहेत. या ९ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ५ रुग्ण आहेत तर १ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ६० या वयोगटातील आहेत तर, एक रुग्ण ४० वर्षांखालील आहे. मालेगाव येथील मृत्युमुखी पडलेल्या २ रुग्णांना इतर काही आजार आहेत का याची माहिती अद्याप मिळालेली नाही. उर्वरित ७ जणांपैकी ५ रुग्णांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना 
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ३६४ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण ५६४८ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी २१.८५ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे. सध्या राज्यात ९३,६५५ लोक होम क्वारंटाइनमध्ये असून ६,८७९. लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus maharashtra update total affected patients