Coronavirus : बारामतीतील भाजीविक्रेत्या कोरोनाग्रस्ताचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 9 April 2020

शहरातील कोरोनाबाधित भाजीविक्रेत्याचा आज (ता. ०९) पहाटे मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरात खळबळ माजली असून आता सर्वांनीच कमालीची काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

बारामती (पुणे) : शहरातील कोरोनाबाधित भाजीविक्रेत्याचा आज (ता. ०९) पहाटे मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरात खळबळ माजली असून आता सर्वांनीच कमालीची काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

संबंधित व्यक्तीला अर्धांगवायूचा त्रास होता, त्यांची प्रतिकारशक्तीही कमी होती. त्यांना दवाखान्यात दाखल केल्यानंतर त्यांची प्रकृती खालावली होती आज पहाटे त्याचा मृत्यू झाला. त्यांच्याच कुटुंबातील मुलगा, सून व दोन नातींनाही कोरोनाची बाधा झाली आहे. या घटनेमुळे बारामतीत कोरोनाचा पहिला बळी गेला आहे.

Coronavirus : जगभरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा १५लाखांवर तर, मृत्यूंचा आकडा...

या घटनेनंतरही अजूनही लोक रस्त्यावर फिरत असून लोकांनी घरात राहणे गरजेचे असल्याचे प्रशासनाचे मत आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल (ता. ०८) बारामतीत भिलवाडा पँटर्न राबविण्याचे जाहीर केले असून आज सकाळी वरिष्ठ अधिका-यांची बैठक घेऊन त्यात याबाबतच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला आहे.

काय आहे भिलवाडा पॅटर्न
राजस्थानमधील भिलवाडामध्ये लॉकडाऊन करून कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात आले. तसेच, बारामती शहरातील प्रत्येकाची घरोघर जाऊन तपासणी करणे, ही तपासणी किमान तीन वेळा करणे, या तपासणीसाठी वेगळी टीम काम करणार असून ज्या नागरिकांना सर्दी, ताप आणि खोकल्याची लक्षणे आढळतील, त्यांच्यावर विशेष लक्ष वैद्यकीय पथकांमार्फत दिले जाणार, सर्व जीवनाश्यक वस्तू लोकांनी दुकानात जाऊन खरेदी करण्यापेक्षाही त्यांना घरपोच पुरविण्याची व्यवस्था करणे, अशा उपायांचा भिलवाडा पॅटर्नमध्ये समावेश आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus one corona petient Dies in Baramati