coronavirus: : रिक्षावाले ते रिक्षावालेच; कोरोनाच्या लॉक डाऊनमध्ये लुटालूट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी लोकल आणि सार्वजनिक वाहतूक सेवा बंद केली आहे. त्याचाच गैरफायदा काही शेअर रिक्षा चालक घेताना दिसत आहेत.

पिंपरी : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी लोकल आणि सार्वजनिक वाहतूक सेवा बंद केली आहे. त्याचाच गैरफायदा काही शेअर रिक्षा चालक घेताना दिसत आहेत. त्यांनी नेहमीच्या मार्गावर 10 रुपयांऐवजी 30 रुपये आकारणी सुरू केली आहे. त्यामुळे दुष्काळात तेरावा महिना म्हणण्याची वेळ प्रवाश्यांवर आली आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मोरवाडी मार्गे थेरगाव,  पिंपरी शगुन चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे काळेवाडी अशा दररोज शेकडो रिक्षा धावतात. पण अनेक संघटित रिक्षानीं वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे शहरांतर्गत प्रवासासाठी सोयीच्या ठरणाऱ्या  शेअर ऑटो रिक्षांचा व्यवसाय तेजीत आल्याचे दिसून आले आहे. शहरात काही मार्गावर शेअर रिक्षा धावतात. यातून एका वेळी तीन ते चार प्रवासी वाहतूक केली जाते. विशेषत: रेल्वेस्थानकापासून विविध नागरीवस्ती पर्यंत जाण्यासाठी एरवीपेक्षा तिप्पट रुपये आकारणी केली जात आहे. या रिक्षा चालकांकडून प्रवाश्यांची लूट केली जात आहे.

coronavirus : अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्यांना पोलिसांकडून मिळणार पास

या मार्गांवर होतेय लूट 
कावेरी चौक (16 नंबर रोड ) ते थेरगाव डी मार्ट - 10 रुपये ऐवजी 50 रुपये 
पिंपरी चौक ते शगुन चौक  : 20 रुपये 
शगुन चौक ते थेरगाव : 20 रुपये 
नेहरूनगर ते भोसरी मार्ग  : 30रुपये


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus pimpri chinchwad auto rickshaw drivers charging extra lockdown