पुणेकरांनो जाणून घ्या तुमच्या भागातली मंडई; उद्यापासूनच मिळणार भाजी

टीम ई-सकाळ
गुरुवार, 26 मार्च 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांच्या लॉक डाऊनची घोषणा केल्यानंतर पुणेकरांनी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी केली होती.

पुणे Coronavirus : पालेभाज्या पुरविणारे शेतकरी, शेतकरयांचे गट, आडते आणि हमालांशी चर्चा केल्यानंतर पुणेकरांना रोज त्या-त्या भागांत भाजी पुरविण्याच्या उपक्रमाला आतता शनिवारपासून (ता.२८) सुरवात होईल. त्यामुळे पुणेकरांना आठवडे बाजाराच्या ठिकाणांसह मंडई, काही क्षेत्रीय कार्यालयांच्या आवारात रोज भाजी मिळेल. मात्र, रोजच फळ, पालेभाज्या आणि फळे मिळणार असल्याने लोकांनी गर्दी करू नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांच्या लॉक डाऊनची घोषणा केल्यानंतर पुणेकरांनी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी केली होती. मुळात कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी गर्दी टाळायला हवी. पण, कोरोनाला रोखण्यासाठी अजूनही पुढील १९ दिवस 'लॉकडाऊन' असल्याने भाजीपाला मिळणार नसल्याच्या शक्यतेने लोक संभ्रमावस्थेत आहेत. परिणामी, गुलटेकडी येथील मार्केट यार्डासह विविध मंडईत भाजी खरेदीसाठी प्रचंड गर्दी होत आहे. ती टाळण्यासह लोकांना घराजवळ पुरेशा प्रमाणात भाजी उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

थेट शेतकऱ्यांकडून येणार माल
शहरात ज्या ठिकाणी माल उतरविणे, त्यानंतर राहिलेल्या मालाची वाहतूक करणे शक्य आहे; अशाच ठिकाणी भाजी विक्री केंद्र सुरू असतील. त्याशिवाय, मोठ्या सोसायट्यांच्या आवारातही भाजी उपलब्ध होऊ शकते, मात्र तिथे बाहेरील लोकांना येण्यास सोसायट्यांमधील रहिवाशांचा विरोध आहे. त्यामुळे अडचणी येत आहे. मात्र, काही शेतक-यांना परवानगी दिल्यास सोसायट्यांतही भाजी मिळणार आहे, असे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले. पुणेकरांना रोज ताजी भाजी मिळावी, यासाठी थेट शेतकऱ्यांमार्फतच मालाची विक्री करण्यात येणार आहे. त्यानुसार पुणे जिल्हा आणि अन्य काही भागांतील शेतकऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे. त्यामुळे भाजीपाला काही प्रमाणात स्वस्तही मिळेल, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी गुरुवारी सांगितले.

या ठिकाणी मिळणार भाजी
1. धानोरी - तिरुपती वसंतम सोसायटी जवळ
2. धानोरी रस्ता - अंबानगरी काशी गंगा सोसायटीजवळ
3. धानोरी रस्ता - गोल बिल्डींग शेजारी
4. विश्रांतवाडी आळंदी रस्ता - पोलीस स्टेशन लगत पोलीस वसाहत
5. येरवडा मध्यवर्ती कारागृहाच्या शासकीय वसाहतीमध्ये, हनुमान मंदिराशेजारील जागा, विमानतळ रोड
6. महापालिकेची मोकळी जागा नदीपात्राशेजारी गोल्डन जिम समोर, कल्याणी नगर
7. सौ शिलाराज साळवे भाजी मार्केट मंडई
8. मनपा शाला मुरकुटे विद्यालय बाणेर
9. औंध गाव भाजी मंडई
10. मनपा गार्डन व श्री हॉटेल समोर, बाणेर
11. महानगर पालिकेची मोकळी जागा, पाषाण सुर रस्ता, सुतारवाडी सस्ता
12. नवचैतन्य हास्य क्लब परिसर, पाषाण सुस रोड पाषाण
13. बालेवाडी गाव पाण्याच्या टाकीजवळ
14. दसरा चौक, मिटकॉन जवळ बालेवाडी
15. पॅन कार्ड रोड, पीएमसी ग्राऊंड बीकानेर
16. गणराज चौक, गेरा सोसायटी समोर, बाणेर
17.जीत मैदान पौड रोड, कोथरुड
18. लेन नं. 3 उजवी भुसारी कॉलनी, सावरकर मैदान, कोथरुड
19. मनपा प्लॉट एल.एम.डी.चौक कोथरूड
20. लेन नं.1 उजवी भुसारी कॉलनी सोमेश्वर मैदान कोथरुड
21. पीएमसी इमारतीजवळ औंध
22. एलएमडी गार्डन समोर बावधन
23. एकलव्य कॉम्प्लेक्स मागे, जिजाईनगर डी विंग समोर कोथरुड
24. दामोदर विल्हा ह. सोसा. कर्वे रोड कोथरुड बस स्थानका समोर
26. मदनदादा मुंडे मंडई भाजी मार्केट
27. सुमनताई माथवड भाजी मंडई
28. जोग शाळेजवळ कोथरुड
29. भुजबळ बंगल्या शेजारी, कर्वेनगर
30. साकेत सोसायटी, मनपा टंकर जवळ
31. बायोगॅस शेजारील मोकळी जागा, शिवाजीनगर
32. भोसले लाइट रेंज हिल्स रोड, भोसले नगर
33. महात्मा फुले मंडई
34. नासी फडके चौक, विजय नगर कॉलनी, सदाशिव पेठ
35. हुतात्मा भाई कोतवाल भाजी मार्केट कसबा पेठ/सोमवार पेठ
36. गणेश पेठ भाजी मंडई
37. खेडेकर मार्केट खडकमाळ आळी/ महात्मा फुले मंडई
38. सोमवार पेठ सीताराम थोपटे भाई मार्केट
39. बी.टी. कवडे रोड, भारत पेट्रोल पंपाजवळ घरपडी, हडपसर
40. पंडित जवाहरलाल नेहरू भाजी मंडई हडपसर
41. साध्वी सावित्रीबाई फुले मंडई सातववाडी
42. साळुंखे विहार चौक, साळुंखे विहार रोड नाना-गार्डन शेजारी
43. सीआरपीएफ मैदान समोर वानवडी
44. साळुंखे विहार चौक, साळुंखे विहार रोड नाना-गार्डन शेजारी
45. एनआयबीएम रोड, लोणकर टायर्स शेजारी कोंढवा
46. शांताई भाजी मंडई कोंढवा खुर्द
47. कोंढवा पोलीस स्टेशनसमोर
48. दत्तवाडी तपोभुमी मैदान दांडेकर पुल
49. प्रभाग 30 सईनगर, सिंहगड रोड
50. सह्याद्री ग्राऊंड लक्ष्मीनगर, पर्वती
51. कॅनल रोड वारजे
52. आदित्य गार्डन सोसायटी, वारजे
53. स.नं.79 वारजे माळवाडी
54. एनडीए रोड उड्डाण पुलाजवळ वारजे
55. प्रभाक 33 राजयोग सोसायटी जवळ
लगडमाळ
56. दत्त कृष्णाई गार्डन जवळ धायरीफाटा
57. बस स्थानक मैदान, प्रभाग 34
58. तुळशीबागवाले कॉलनी सहकरानगर
59. सह्याद्री ग्राऊंड लक्ष्मीनगर पर्वती
60. न्यु मिलेनियम स्कूल, बिबवेवाडी
61. मनपा प्राथमिक शाळा, बिबवेवाडी
62. गंगाधाम चौकाजवळ, बिबवेवाडी
63. महर्षी नगर, एम.आर. ड्राइक्लीनर समोर
64. स.नं. 29/8 अष्टेकर कन्ट्रक्शन जवळ शिव गोरक्ष मंदिराशेजारी कात्रज कोंढवा रोड
65. कात्रज डेअरी ग्राऊंड कात्रज
66. कोंढवा बह्मा मॅजीस्टीक सोसायटी जवळ
67. स.न 63 कोंढवा खुर्द


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus pmc initiative for vegetables distribution system