पुणेकरांसाठी संडे ठरला दिलासादायक; वाचा आजचा रुग्णांचा आकडा 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 26 April 2020

शहरात गेल्या तीन दिवसांत 288 इतके नवे रुग्ण सापडले आहेत. त्यात सलग दोन दिवस शंभरपेक्षा अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे पुणेकरांत भीती होती; परंतु, गेल्या चोवीस तासांत ही संख्या कमी झाली आहे.

पुणे : पुण्यात गेली तीन दिवसा झपाट्याने पसरलेल्या कोरोनाचा संसर्ग रविवारी मात्र थोडासा आटोक्याभत राहिला असून, दिवसभरात नवे 72 रुग्ण सापडले आहेत. या रुग्णांमुळे एकूण संख्या 1 हजार 139 पर्यंत गेली असली तरी; त्यातील 908 जण रुग्णालयांत आहेत. तर पाच रुग्ण मरण पावले असून; मृतांचा आकडा मात्र आता तीनशेंच्या घरात पोचला आहे. त्याचवेळी आणखी 44 रुग्णांची स्थिती गंभीर आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, कोरोनामुक्त झालेल्या सहा जणांना घरी सोडण्यात आल्याने बरे झालेल्या रुग्णांची संख्या 165 झाली आहे. शहरात गेल्या तीन दिवसांत 288 इतके नवे रुग्ण सापडले आहेत. त्यात सलग दोन दिवस शंभरपेक्षा अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे पुणेकरांत भीती होती; परंतु, गेल्या चोवीस तासांत ही संख्या कमी झाली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहराच्या विविध भागांतील सुमारे 7 हजार 230 जणांच्या घशातील द्रव पदार्थांच्या नमुन्यांची तपासणी झाली आहे. त्यापैकी 6 हजार 105 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर 1 हजार 139 जण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यापैकी 74 जणांचा मृत्यू तर 165 बरे झाले आहेत. कोंढव्यातील 40 वर्षाच्या पुरुषाचा मृत्यू झाला असून, त्यांना कोरोना झाल्याने 18 एप्रिलला रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर रविवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यांना मुत्रपिंडाचा त्रास होता. हडपसरमधील 66 वर्षाच्या पुरुषाला शनिवारी दाखल केले होते; मात्र उपचारादरम्यान रविवारी त्यांचा मृत्यू झाला. परंतु, या व्यक्तीच्या तपासणीचा अहवाल रविवारी रात्रीपर्यंत आला नव्हता. शिवाजीनगरमधील 65 वर्षाच्या पुरुषाचा मृत्यू झाला आहे.

कोरोना असताना 'तो' गावी चालत गेला; पुण्यात केला होता मुक्काम


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus pune city patients number reduced

Tags
टॉपिकस