पुण्यासाठी अभिमानास्पद : कोरोनाचे 15 मिनिटांत निदान; रॅपिड किटला परवानगी

टीम ई-सकाळ
Tuesday, 21 April 2020

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठ्या जनसंख्येचे कोविड-19 संबंधी चाचणी होणे गरजेचे आहे.

पुणे Coronavirus : कोरोनाचे निदान आता 15 मिनिटात करणे शक्य होणार आहे. पुण्यातील इम्यूनोसायन्स आणि बायोलिंक्स लॅबसिस्टम यांनी विकसित केलेल्या "इम्यूनोक्विक रॅपिड कोविड-19 टेस्ट कीट'ला भारतीय वैद्यक परिषदेने (आयसीएमआर) परवानगी दिली असून, किटचे उत्पादनही सुरू झाले आहे. मोठ्या जनसंख्येचे जलदगतीने निदान करणे आता शक्य होणार आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्थेचे (एनसीसीएस) माजी वैज्ञानिक आणि बायोलिंक्सरचे डॉ. श्रीकांत पवार म्हणाले,""कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठ्या जनसंख्येचे कोविड-19 संबंधी चाचणी होणे गरजेचे आहे. त्यासाठी अँटीबॉडीच्या आधारे निदान करणारे हे तंत्रज्ञान विकसित केले असून, किटच उत्पादनही मोठ्या प्रमाणावर सुरू झाले आहे.'' देशातील कोरोनाविरुद्धच्या लढाईला सकारात्मक कलाटणी देण्याचे काम हे किट करेल, असा विश्वास कंपनीचे संचालक अतुल तरडे यांनी व्यक्त केला आहे. सध्या कॅलिफोर्नियात असलेले डॉ. सतीष आपटे यांच्या प्रयत्नातून इम्युनोसायन्सची स्थापना करण्यात आली आहे. बायोलिक्स्चे मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल गोर यांच्या नेतृत्वात किटची रचना विकसित करण्यात आली आहे. तसेच, अविनाश तुळसकर, अमृत कारे आदींचा यात समावेश आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

असे होते निदान 

  • कोविड-19ची नुकतीच लागण झालेला, पूर्णतः बाधित आणि बरा झालेल्या रुग्णाचे निदान करणे शक्यर 
  • व्यक्तीचे रक्त, प्लाझ्मा आणि सिरमच्या नमुन्याचा वापर 
  • कोरोना बाधीच्या शरीरात विकसित होणाऱ्या अँटीबोडीजच्या आधारे होते निदान 
  • अँटीबॉडी आणि अँटीजन यांच्यातील अभिक्रियेतून एका विशिष्ट रंगाचे निर्देशन होते 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

निदानाची वैशिष्ट्‌ये 

  • कोविड-19च्या आरएनएचे पीसीआर टेक्नी कने डीएनए विकसित करण्याची आवश्यगकता नाही 
  • रक्तगट तपासण्या इतके सहज, सोपी आणि सुरक्षित प्रक्रिया 
  • केवळ 15 मिनिटांत निदान होते 
  • निदानामध्ये 97.7 टक्के संवेदनशीलता आणि 93 टक्के विशिष्टता 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus pune Immunoscience and biolinx labsystems testing kits approval