ही आहे, पुण्यातल्या रुबी हॉल क्लिनिकच्या 'बातमी'मागची बातमी!

टीम ई-सकाळ
Tuesday, 21 April 2020

आतापर्यंत जवळपास एक हजार कर्मचाऱ्यांची तपासणी केली असून त्यापैकी 25 पॉझिटिव्ह आहेत.

पुणे Coronavirus : पुण्यातील प्रसिद्ध रुबी हॉल क्लिनिकमध्ये कोरोना पॉझिटिव्हचे पंचविस रुग्ण आढळळे असल्याच्या बातमीची महाराष्ट्रात आज चर्चा सुरू आहे. सोशल मीडिया आणि टीव्हीवरून सुरू असलेल्या बातम्यांमध्ये एका दिवसात 25 रुग्ण आढळल्याचे चित्र निर्माण झाले आहे. गेले पंधरा दिवस या हॉस्पिटलमधील एक हजार कर्मचाऱ्यांची तपासणी केली आहे आणि गेल्या पंधरा दिवसांतील एकूण आकडा 25 झाला आहे, ही वस्तुस्थिती आहे.

कोरोनाविषयीच्या पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

अशी झाली संसर्गाला सुरुवात
संसर्गाची सुरुवात पंधरा दिवसांपूर्वी,  कासारवाडियारेहून आलेल्या कर्मचाऱ्याच्या एका घटनेने झाली. त्यामुळे आम्ही त्वरीत तपासणी सुरू केली. आतापर्यंत जवळपास एक हजार कर्मचाऱ्यांची तपासणी केली असून त्यापैकी 25 पॉझिटिव्ह आहेत. या सर्वांना कोणतीही लक्षणे नसून त्यांची प्रकृती स्थिर आहे, असे हॉस्पिटल प्रशासनाने सांगितले. रुबी हॉल क्लिनिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी बोमी भोट म्हणाले की यामधील पॉझिटिव्ह आढळल्यांपैकी कोणालाही सपोर्ट सिस्टीम किंवा व्हेंटिलेटरची गरज भासली नाही. या सर्वांचे विलगीकरण केले असून कोरोनाची साखळी विस्तारण्यापासून रोखले आहे. रुग्णांना तत्काळ अलग केल्यास कोरोनाची साखळी तोडता येते. हा संदर्भ घेऊन ते म्हणाले, एकही रुग्ण या घटनेने संक्रमित झाला नाही हे सुनिश्चित झाले आहे. या क्षणी, 19 परिचारिका, तीन सहाय्यक कर्मचारी आणि तीन क्लिनिकल असिस्टंट्सचे विलगीकरण केले आहे. त्यांच्या संपर्कात आलेले व्यक्ती शोधून त्यांच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही हॉस्पिटलमधील एक पूर्ण इमारत संभाव्य कोरोना रुग्णांसाठी समर्पित केली आहे.

कोरोनाविषयीच्या पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus ruby hall clinic medical staff infected facts marathi information