...आता यशवंतराव चव्हाण रुग्णालयात होणार कोरोना तपासणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

कोरोना लक्षणे आढळून आलेल्या रुग्णांची तपासणी आता यशवंतराव चव्हाण रुग्णालयात (वायसीएम)होणार आहे. तशी मान्यता भारतीय वैद्यक संशोधन (आयसीएमआर) परिषदेने दिली आहे.

पिंपरी : कोरोना लक्षणे आढळून आलेल्या रुग्णांची तपासणी आता यशवंतराव चव्हाण रुग्णालयात (वायसीएम)होणार आहे. तशी मान्यता भारतीय वैद्यक संशोधन (आयसीएमआर) परिषदेने दिली आहे. दहा दिवसांत लॅब उभारून घशातील द्रव पदार्थ नमुने (स्वॅब) तपासणी सुरू होणार आहे. त्यामुळे अवघ्या काही तासात कोरोना संसर्गजन्य रुग्ण ओळखता येणे शक्य होणार आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आयसीएमआरच्या नियमानुसार परदेशातून आलेल्या व कोरोना सदृश्य असलेल्याची वैदकीय चाचणी या ठिकाणी करण्यात येणार आहे. यापूर्वी 24 तासात ही माहिती कळविली जात होती. आता अवघ्या काही तासात ही तपासणी शक्य होणार आहे. त्यामुळे डॉक्टरावरचा ताण हलका होण्यास मदत होणार आहे.  या चाचणीसाठी सरकारने मान्यता दिलेले किट डॉक्टरांसाठी उपलब्ध होणार आहे. या स्वॅब घेण्याच्या पद्धतीचे प्रशिक्षण डॉक्टरांना आहे. त्यानुसार वैद्यकीय चाचणी करण्यात येणार आहे. 

यासाठी पॅथॉलॉजिस्ट, मायक्रोबायोलॉजिस्ट, व टेक्निशिअन तज्ज्ञ डॉक्टर असणार आहेत. वायसीएममध्ये दुसऱ्या मजल्यावर हे कक्ष उभारण्यात येणार आहे. बायोमेडीकल वेस्ट व डिसपोजलची सुविधा देखील या ठिकाणी केली जाणार आहे. तसेच वातानुकूलित यंत्रणा अद्यावत केली जाणार आहे. त्यानुसार दिल्लीहून वैदकीय साहित्य मागविण्याचे काम सुरू झाले आहे .

Corona Virus : कोरोना आपत्ती निवारणासाठी राजपत्रित अधिकार्‍यांकडून दोन दिवसाचे वेतन

 आयुक्त श्रवण हर्डीकर यांनी लॅबसाठी मंजुरी दिली आहे. संक्रमण टाळण्यासाठी व तपासणी मधील वेळ वाचविण्यासाठी ही लॅब लवकरात लवकर उभारली जाईल अशी माहिती डॉ. राजेंद्र वाबळे यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus test to be held at YCM hospital

टॅग्स
टॉपिकस