Corona Virus : कोरोना आपत्ती निवारणासाठी राजपत्रित अधिकार्‍यांकडून दोन दिवसाचे वेतन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

महासंघाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत पत्र पाठविले आहे. कोरोना आपदग्रस्त परिस्थितीत राज्यातील जनतेला धीर देत आपण अतिशय संयमाने संयमाने प्रभावी उपाययोजना आखत आहात. त्यामध्ये तळहातावर पोट असणाऱ्या सामान्य जनतेविषयीची तळमळ आणि काळजी ही देखील गरजेची बाब आहे.

पुणे : कोरोना आपदग्रस्त परिस्थितीत राज्यातील अधिकाऱ्यांकडून दोन दिवसांचे वेतन मुख्यमंत्री निधीसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्यावतीने ही माहिती देण्यात आली. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महासंघाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत पत्र पाठविले आहे. कोरोना आपदग्रस्त परिस्थितीत राज्यातील जनतेला धीर देत आपण अतिशय संयमाने संयमाने प्रभावी उपाययोजना आखत आहात. त्यामध्ये तळहातावर पोट असणाऱ्या सामान्य जनतेविषयीची तळमळ आणि काळजी ही देखील गरजेची बाब आहे.

coronavirus : अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्यांना पोलिसांकडून मिळणार पास

कोणत्याही आपदग्रस्त परिस्थितीत राज्यातील अधिकारी सरकारसोबत खंबीरपणे उभे राहिले आहेत. सध्याची परिस्थिती ही जागतिक आपत्ती असून, त्याच्या प्रभावी निवारणासाठी राज्यातील राजपत्रित अधिकाऱ्यांच्या मार्च महिन्यातील दोन दिवसाचा पूर्ण पगार परस्पर मुख्यमंत्री निधीमध्ये जमा करावा. तसेच राज्याला या जागतिक आपत्तीमधून सावरण्यासाठी एकजुटीने सर्वांनी राज्य सरकारला सर्वतोपरी सहाय्य करावे, असे आवाहन महासंघाच्या वतीने मुख्य सल्लागार ग.दि.कुलथे, अध्यक्ष विनोद देसाई, सरचिटणीस विनायक लहाडे, डॉ.सोनाली कदम, नितीन काळे आदींनी केले आहे.
त्यांनी"जपली माणुसकी; लॉक डाऊन मध्येही जेवणाची सोय

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two days pay from Gazetted Officers for Corona disaster relief