बापरे! रुपीनगरचे आणखी तीन पॉझिटिव्ह! एक मोशीतील

सकाळ वृत्तसेवा
Monday, 27 April 2020

रुपीनगर परिसरात एकाच दिवशी बारा जणांचे रिपोर्ट पाॅझिटिव्ह आले होते.आज तीन दिवसांनी आणखी तिघांचा रिपोर्ट पाॅझिटिव्ह आला आहे.शहरातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 89 झाली आहे.

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील निगडी-रुपीनगर परिसरातील तिघांसह मोशीतील एका व्यक्तीला कोरोना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. सोमवारी सकाळी त्यांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रुपीनगर परिसरात एकाच दिवशी बारा जणांचे रिपोर्ट पाॅझिटिव्ह आले होते. आज तीन दिवसांनी आणखी तिघांचा रिपोर्ट पाॅझिटिव्ह आला आहे. शहरातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 89 झाली आहे. त्यातील 28  जण बरे होऊन घरी गेले आहेत. आजपर्यंत चौघांचा मृत्यू झाला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महापालिकेने रविवारी (दि. 26) 116 जणांचे  नमुने तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठविले होते. त्याचे रिपोर्ट आज आले आहेत. त्यामध्ये रुपीनगर परिसरातील रहिवाशी असलेल्या 28, 26 वर्षीय दोन पुरुषांचे आणि 25 वर्षाच्या महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ते हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील आहेत.  

सात दिवसांत 28 नवीन रुग्ण 
शहरात कोरोना संसर्ग वाढू नये, यासाठी 19 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून म्हणजेच 20 एप्रिलपासून संपूर्ण शहर सील करण्यात आले. आज आठवा दिवस उजाडला आहे. या कालावधीत 28 रुग्णांची भर पडली आहे. 

दरम्यान, 10 मार्चपासून पिंपरी-चिंचवड शहरातील आणि शहराबाहेरील पण शहरात उपचार सुरू आहेत अशा 89 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 28  रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. चार जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना बाधित सक्रिय 57 रुग्ण शहरात आहेत. त्यातील तीन जण शहराबाहेरील आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus Three more positives from Rupinagar