पुण्यात ससूनमधला मृत्यूदर होणार कमी; तीन कलमी कार्यक्रम राबवणार

टीम ई-सकाळ
Saturday, 18 April 2020

राज्यातील कोरोना उद्रेकातील सरकारचे प्रमुख तांत्रिक सल्लागार डाँ. सुभाष साळुंखे यांनी ही त्रिसूत्री तयार केली आहे.

पुणे Coronavirus : ससून रुग्णालयातील कोरोना विषाणूंच्या संसर्गाचा मृत्यूदर कमी करण्यासाठी 'त्रिसूत्री' शनिवारी निश्चित करण्यात आली. लवकर निदान, स्पष्ट लक्षणे नसणारे रुग्ण आणि अतिदक्षता विभागातील रुग्णसेवेचा दर्जा आणखी उंचावणे या त्रिसूत्रीच्या आधारावर मृत्यूदर कमी करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍ

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दर्जा उंचवण्यास प्राधान्य 
राज्यातील कोरोना उद्रेकातील सरकारचे प्रमुख तांत्रिक सल्लागार डाँ. सुभाष साळुंखे यांनी ही त्रिसूत्री तयार केली आहे. त्या अनुंशाने झालेल्या बैठकीत बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाँ. मुरलीधर तांबे, वैद्यकीय अधिक्षक डाँ. अजय तावरे यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित होते.  डाँ. साळुंखे म्हणाले, “ससून रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल कोरोनाच्या रुग्णांच्या वैद्यकीय सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी प्राधान्य देण्यात आले आहे. अत्यवस्थ रुग्णाची देखरेख करण्याची व्यवस्था उभारण्यात आली आहे. त्यामुळे सुरवातीपासूनच रुग्णावर उपचार सुरू होतील. रुग्णाचे लवकर निदान, यावर भर देण्यात आला आहे. उपचारासाठी रुग्ण लवकर रुग्णालयात पोचेल अशी व्यवस्था महापालिकेच्या मदतीने तयार करण्यात येत आहे.” ससून रुग्णालयातील रुग्णांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आणखी वाचा - पुणेकरांची चिंता वाढवणारी बातमी

काळ्या फिती लावून काम
पुण्यात कोरोना विषाणूंचा उद्रेक सुरू असतानाच बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती. कोरोनामुळं उद्‌भवलेल्या परिस्थीतीच्या अनुशंगाने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून रुग्णालयाची उपाययोजनेचे अधिकार विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांना दिले. दरम्यान, या बदलीच्या निषेधार्थ ससूनमधील कर्मचाऱ्यांनी काळ्याफिती लावून काम केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus three steps program for control death toll sassoon hospital