पुण्याची मोठी बातमी : 27 एप्रिलपर्यंत संपूर्ण शहर 'सील'

टीम ई-सकाळ
Sunday, 19 April 2020

पुणे शहरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढत होत असून, ती आणखी वाढण्याची सील करण्यात आला होता.

पुणे Coronavirus : पुण्यात कोरोना आणखी पसरण्याची चिन्हे असल्याने आता सबंध महापालिका हद्द येत्या २७ एप्रिलपर्यंत 'सील' करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने रविवारी घेतला. हा निर्णय रविवारी रात्री बारा वाजल्यापासून लागू होईल. त्यामुळे नागरिकांना आता आपल्या भागातून दुसऱ्या परिसरात ये-जा करता येणार नाही. त्याचवेळी सूंपर्ण शहरातील जीवनावश्यक वस्तुंच्या विक्रीची दुकाने केवळ दोन तास सुरू राहतील. 

पुण्याच्या इतर बातम्यांसाठी येथे ► क्लिक करा 

दरम्यान, अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या घटकांना मात्र या निर्णयातून सवलत आहे. नव्या निर्णयानुसार शहरातील सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील भाग 'सील' करून त्याबाबतची कार्यवाही पोलिसांमार्फत होणार आहे. त्यानुसार तयारी करण्याबाबत सूचना पोलिसांशी चर्चा झाली आहे, असे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले. पुणे शहरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढत होत असून, ती आणखी वाढण्याची सील करण्यात आला होता. तरीही, बहुतांशी भागांत रुग्ण वाढल्याने शेवटी महापालिकेची संपूर्ण हद्दच सील करण्याची भूमिका महापालिकेने घेतली आहे.

पुण्याच्या इतर बातम्यांसाठी येथे ► क्लिक करा 

त्यामुळे येत्या २७ एप्रिलपर्यंत महापालिकेच्या हद्दीतील सर्व प्रमुख रस्ते, गल्लीबोळ पूर्णपणे बॅरिकेडच्या माध्यमातून बंद केले जाणार आहे. तसेच, नागरिकांना रोज सकाळी दहा ते बारा या वेळेत जीवनाश्यक वस्तुंची खरेदी करता येणार आहे. गायकवाड म्हणाले, "वेगवेगळ्या पातळ्यांवर उपाय करूनही कोरोना आटोक्यात येत नाही. त्यामुळे संपूर्ण शहर सील राहील. त्यामुळे सर्वत्र संचारबंदी असेल. परंतु, नागरिकांच्या सोयीसाठी अत्यावश्यक सेवा सुरू राहतील."
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus whole pune city will sealed till 27th april