पुण्याची आजची महत्त्वाची बातमी : नगरसेविकेला कोरोनाची लागण 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 29 April 2020

पुण्यात कोरोनाने आपला मोर्चा आता राजकारण्यांकडे वळविला असून, पुणे महापालिकेतील एका राजकीय पक्षाची नगरसेविका आणि तिच्या लहान मुलगा कोरोना "पॉझिटिव्ह' असल्याचे बुधवारी तपासणीनंतर पुढे आले आहे. नगर रस्त्यावरील नगरसेविका कोरोना झाल्याने या भागांत प्रचंड घबराट निर्माण झाली आहे. दरम्यान, तपासणी अहवाल येताच नगरसेविकेला खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

पुणे  - पुण्यात कोरोनाने आपला मोर्चा आता राजकारण्यांकडे वळविला असून, पुणे महापालिकेतील एका राजकीय पक्षाची नगरसेविका आणि तिच्या लहान मुलगा कोरोना "पॉझिटिव्ह' असल्याचे बुधवारी तपासणीनंतर पुढे आले आहे. नगर रस्त्यावरील नगरसेविका कोरोना झाल्याने या भागांत प्रचंड घबराट निर्माण झाली आहे. दरम्यान, तपासणी अहवाल येताच नगरसेविकेला खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पहिल्यांदाच नगरसेवक
पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने आपला आवाका वाढविला आहे. हा रोग रोज जवळपास 80 ते 100 रुग्णांना आपल्या कवेत घेत आहे. विशेषत: पेठांमधील भवानी पेठ, कसबा पेठ, ढोले-पाटील रस्ता परिसरासह येरवडा आणि आजुबाजुच्या परिसरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडले आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिक प्रचंड धास्तावले आहेत. त्यावर उपाययोजना केल्या जात असल्या तरी, कोरोना रुग्णांची संख्या आटोक्याठत येईनाशी झाली आहे. तेव्हाच, नगर रस्ता परिसरातील एका नगरसेविकेलाच कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या नगरसेविका महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत पहिल्यादांच निवडून आल्या आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मदतीला धावले दाम्पत्य
कोरोनाच्या पार्श्वतभूमीवर "लॉकडाऊन' जाहीर होताच संबंधित नगरसेविका आणि तिचे पती लोकांच्या मदतीला धावून आले. गरजुंना रोज धान्य आणि अन्य आवश्यडक वस्तुंचे वाटपही त्यांच्याकडून सुरू होते. याच दरम्यान एखाद्या कोरोना रुग्णाचा संपर्क झाल्याने त्यांना लागण झाल्याचा संशय आहे. दुसरीकडे, कोरोना झालेले सात ज्येष्ठ नागरिक पूर्णपणे बरे झाले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याने बुधवारी त्यांना घरी सोडण्यात आले.

'काय करणार इथं राहून, आता चालतच झारखंडला निघालोय'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus woman municipal corporation members got affected