
तीन महिन्यापासून पगार नाही. जेवण नाही. रहायला जागा नाही. काय करणार इथं राहून. त्यापेक्षा पायी चालत मरू,’’ अशी व्यथा वारजे येथे एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या झारखंड येथील मजुरांनी व्यक्त केली.
पुणे : ‘‘तीन महिन्यापासून पगार नाही. जेवण नाही. रहायला जागा नाही. काय करणार इथं राहून. त्यापेक्षा पायी चालत मरू,’’ अशी व्यथा वारजे येथे एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या झारखंड येथील मजुरांनी व्यक्त केली. त्यांनी पुणे ते झारखंड, असा हजारो किलोमीटरचा प्रवास पायी करण्याचा निर्णय घेऊन गावाकडे प्रस्थानही केले.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
झारखंड येथील आठ मजूर वारजे येथे एका खासगी कंपनीत काम करत होते. मात्र, संबंधित ठेकेदाराने मजुरांचा तीन महिन्याचा पगार थकविला आहे. राहण्याचीही व्यवस्थाही केली नाही. त्यामुळे मजुरांनी बुधवारी ( ता. 29) आपल्या गावी पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
‘‘वारजे येथे रस्त्याचे काम करत होतो. तीन महिन्यापासून पगार नाही. ठेकेदार पळून गेला. त्याने फोन बंद करून टाकला आहे. १५ दिवस पगाराची वाट बघितली. आता उपासमार व्हायला लागली. रहायलाही जागा नाही. म्हणून गावी पायी जात आहोत,’’ अशी व्यथा या मजुरांनी ‘सकाळ’कडे मांडली.
Coronavirus : पुण्याच्या महापौरांचे पत्र व्हायरल; रोहित पवारांनी केला खुलासा
‘‘वाटेत मिळेल, तिथं जेवण करू. एखादे वाहन मिळाले, तर त्यातून जाऊ. शक्य तितके पायी चालू. इथं उपाशी मरण्यापेक्षा ते बरं आहे,’’ अशी भावना त्यांच्यातील आणखी एका मजुराने व्यक्त केली.
ब्रिटिश काळातही पुण्यातल्या पेठा रिकाम्या केल्या होत्या; वाचा इंटरेस्टिंग इतिहास