संचारबंदीत विदेशी मद्य विक्री तिप्पट दराने

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 मार्च 2020

विदेशी मद्याची विक्री तिप्पट दराने विक्री करीत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे दरवर्षी ‘ड्राय डे’ ला नफा कमावणाऱ्यांची या संचारबंदीत चांदी झाली आहे.

पुणे - येरवडा परिसरात अनेकजण विदेशी मद्याची विक्री तिप्पट दराने विक्री करीत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे दरवर्षी ‘ड्राय डे’ ला नफा कमावणाऱ्यांची या संचारबंदीत चांदी झाली आहे. ठराविक वस्त्यांसह काही महाभागानी हौस म्हणून केलेला साठा विक्रीसाठी काढून नफा कमावत आहेत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

येरवडा परिसरात काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात हातभट्टी व्यवसायिक आहेत. तर काही भागात ही हातभट्टीची घराघरात विक्री होते. त्यामुळे विक्रेते हातभट्टीसह विदेशी मद्याचाही साठा करतात. रात्री उशीरा विदेशी मद्य विक्रीची दुकाने बंद झाल्यानंतर किंवा पहाटे आणि विशेषतः ‘ड्राय डे’ ला याची मोठ्या प्रमाणात विक्री होते. त्यांच्यावर स्थानिक पोलिस ठाणे तात्पुरती कारवाई होते. मात्र विक्री करणाऱ्यांमध्ये महिलांचा मोठा सहभाग असतो. त्यामुळे त्यांच्यावर किरकोळ प्रतिबंधात्मक कारवाई होत नाही. याचा फायदा ते गेली अनेक वर्षे घेत आहेत.

संचारबंदीच्या काळात याच परिसरात विदेशी मद्य मोठ्या प्रमाणात विकले जाते आहे. याचे दर तिप्पटीने असून देखील ग्राहक घेत असल्याची समजते. येरवडा पोलिसांनी या प्रकरणी संशयीताला ताब्यात घेतले आहे. मात्र अशा अनेक घरात विक्री होत असून त्यांच्या पर्यंत पोलिसांना पोहचणे अशक्य असल्याचे बोलले जाते. कारण पोलिस येण्याच्या आधीच मद्याचा साठा दुसरीकडे हलविले जाते. त्यामुळे पोलिस संबंधितांना केवळ शिवीगाळ करून रिकाम्या हाताने परत येतात.

लोहगाव, कलवड आणि धानोरी येथील काही महाभागांनी हौस म्हणून केलेली विदेशी मद्यसाठा तिप्पट दराने विक्रीसाठी काढले होते. त्यांनी रविवारी, सोमवारी संचारबंदीच्या काळात गरजू तळीरामांना हे मद्य विक्री केल्याचे समजते. यामध्ये तीनशे रूपयांचे मद्य साडेआठशे तर चौदाशे रूपयांचे विदेशी मद्य तीन हजार रूपये दराने विकल्याची माहिती अधिकृत सुत्रांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In curfew Foreign wine sales at triple the rate

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: