Corona Virus : पुण्यात 4 तास बेवारस मृतदेह रस्त्यावर, कोरोनाची भीती? मागत होता 'ही' औषधे

A dead body of a person is lying on road for 4 hours in pune due to fear of corona
A dead body of a person is lying on road for 4 hours in pune due to fear of corona

विश्रांतवाडी(पुणे): विश्रांतवाडी येथे काल रविवारी एका बेवारस मृतदेह आढळून आला, परंतु कोरोनाच्या भीतीमुळे त्याला कोणी हात लावायला तयार नव्हते. त्यामुळे 100 नंबरवर पोलिसांना माहिती कळविण्यात आली. मृतदेह ससून रुग्णालयात नेण्यासाठी पीपीई किट मागविण्यात आले. परिसर व मृतदेह निर्जतुकीकरण करून व पूर्ण खबरदारी घेऊनच संध्याकाळी सातच्या सुमारास मृतदेह हलवण्यात आला.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विश्रांतवाडी येथे येथील प्रवीण टेक्सटाइल या कापड दुकानाजवळ असलेल्या औषध दुकानामध्ये दुपारी दोनच्या सुमारास या व्यक्तीने मला खोकला व सर्दीवरचे औषध द्या, अशी मागणी केली आणि श्वास घ्यायला त्रास होतो असे बोलून नंतर तो अडखळत थोडे अंतर गेला आणि पडला. त्यानंतर तो उठलाच नाही. त्यामुळे 100 नंबरवर पोलिसांना माहिती कळविण्यात आली. या व्यक्तीचे वय अंदाजे 40 वर्षे असावे. गेले आठ-दहा दिवस ही व्यक्ती भीक मागता दिसली होती. गेले दीडदोन वर्षं या परिसरात ही व्यक्ती रस्त्याच्याकडेला राहत असून कुणालाही नाव माहिती नाही. त्यामुळे त्याची ओळख पटवणे पोलिसांनाही अवघड झाले आहे. साधारणपणे साडेतीनच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला असावा.

Coronavirus : आईला कोरोना; पण नवजात अर्भक ठणठणीत

पोलिस निरीक्षक रवींद्र कदम यांनी पंचनामा करून पुढच्या प्रक्रियेच्या सूचना दिल्या. नंतर नगरसेवक ऐश्वर्या जाधव व सामाजिक कार्यकर्ते आशुतोष जाधव यां नी महापालिकेची गाडी बोलावली. या व्यक्तीला कोरोना झाला असावा, असे त्याच्या लक्षणावरून दिसत असल्याने मृतदेह ससून रुग्णालयात नेण्यासाठी पी पी ई किट मागविण्यात आले. परिसर व मृतदेह निर्जतुकीकरण करून व पूर्ण खबरदारी घेऊनच संध्याकाळी सातच्या सुमारास मृतदेह हलवण्यात आला. यासाठी येरवडा वॉर्ड ऑफिसचे ठेकेदार अरुण जंगम व त्यांच्या सहकार्यांची मदत घेण्यात आली. तसेच मृताचे कपडेही जाळून टाकण्यात आले.

Video : आयटीयन्स'ला सोशल डिस्टन्सिंगची धाकधूक; पालकमंत्र्याकडे मांडली कैफियत
दरम्यान पोलिसांनी परिसर सील केला होता. त्या बाजूला कुणालाही जायला मज्जाव करण्यात आला होता. मृतदेह दिसून आल्यापासून उचलून नेण्यापर्यत जो वेळ लागला त्यावरून महापालिकेचा आरोग्य विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्यामध्ये सुसूत्रता नसल्याचे दिसून आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com