Video : आयटीयन्स'ला सोशल डिस्टन्सिंगची धाकधूक; पालकमंत्र्याकडे मांडली कैफियत

सुवर्णा नवले
Monday, 20 April 2020

आयटी कंपन्यांना 50 टक्के कर्मचाऱ्यांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे काटेकारेपणे पालन करत आजपासून (ता.20) कामावर रुजू होण्याच्या सूचना कंपन्यांनी दिल्या आहेत. मात्र, आयटीतील बड्या कंपन्यांमध्ये निम्म्या कर्मचाऱ्यांचीच संख्या सर्वाधिक असल्याने गर्दी होण्याची दाट शक्‍यता आहे. धोक्याची घंटा लक्षात घेता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांना महाराष्ट्र फोरम फाईट असोसिएशनचे प्रमुख पवनजीत माने यांनी निवेदनाद्वारे वर्क फ्रॉम होमच सुरू ठेवण्याची कैफियत मांडली आहे.

पिंपरी - आयटी कंपन्यांना 50 टक्के कर्मचाऱ्यांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे काटेकारेपणे पालन करत आजपासून (ता.20) कामावर रुजू होण्याच्या सूचना कंपन्यांनी दिल्या आहेत. मात्र, आयटीतील बड्या कंपन्यांमध्ये निम्म्या कर्मचाऱ्यांचीच संख्या सर्वाधिक असल्याने गर्दी होण्याची दाट शक्‍यता आहे. धोक्याची घंटा लक्षात घेता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांना महाराष्ट्र फोरम फाईट असोसिएशनचे प्रमुख पवनजीत माने यांनी निवेदनाद्वारे वर्क फ्रॉम होमच सुरू ठेवण्याची कैफियत मांडली आहे.

बातम्या ऐकण्यासाटी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

हिंजवडीमध्ये तीन लाखांच्यावर कर्मखारी कार्यरत आहेत. आयटी कर्मचाऱ्यांना स्वतंत्र जाण्या-येण्याची व्यवस्था करण्याचे सूचित करण्यात आले आहे. मात्र, काही कॅब चालकांना परवानगी दिल्यास ते ही धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. तसेच विविध महत्वाच्या प्रोजेक्‍टवर काम करणाऱ्यांना देखील ई-मेल पाठविले आहेत. काही कंपन्यांनी मेसेजद्वारे कर्मचाऱ्यांना कामावर उपस्थित राहण्याचे कळविले आहे.

अद्यापही पिंपरी-चिंचवड शहर संसर्गाच्या रेडझोनमध्ये समाविष्ट असल्याने परिस्थिती आटोक्‍यात आलेली नाही. बरेच आयटीयन्स कामावरून परतल्यानंतर कुटुंबियांच्या संपर्कात येणारच आहेत. शिवाय सोसायटीधारकही आयटी कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेची तंबी देत आहेत. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी धोका पत्कारून कामावर जाणे कठीण वाटत असल्याचे आयटीयन्सचे म्हणणे आहे.
------
वर्क फ्रॉम होम चोख; तरीही सक्ती कशासाठी...
वर्क फ्रॉम होममध्ये देखील आयटीयन्स आपली भूमिका चोख बजावत आहेत. सुरुवातीला आलेल्या अडचणींवर मात करत त्यांनी यशस्वीरित्या ऑनलाइन कामाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. तरीही आयटीयन्सना कामाची सक्ती नेमकी कशासाठी करण्यात येत आहे हा प्रश्‍न आयटीयन्सना सतावत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Itians social distancing Issue to guardian minister