Video : ढोल-ताशा पथक धावले भुकेलेल्यांसाठी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 21 April 2020

दापोडी, कासारवाडी, भोसरी व फुगेवाडी येथे हातावरचे पोट असलेल्या गरजू बांधवांसाठी कासारवाडीतील मातृभूमी प्रतिष्ठान ढोलताशा पथक धावून आले आहे. गेल्या 21 दिवसांपासून हे पथक अहोरात्र अन्नसेवा देवून भुकेलेल्यांची भूक भागवित आहेत.

पिंपरी - दापोडी, कासारवाडी, भोसरी व फुगेवाडी येथे हातावरचे पोट असलेल्या गरजू बांधवांसाठी कासारवाडीतील मातृभूमी प्रतिष्ठान ढोलताशा पथक धावून आले आहे. गेल्या 21 दिवसांपासून हे पथक अहोरात्र अन्नसेवा देवून भुकेलेल्यांची भूक भागवित आहेत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ढोल-ताशा पथकाचे अन्नदानाचे काम पाहून परिसरातील नागरीक देखील मदतीसाठी धावून आले आहेत. त्याचप्रमाणे पथकाने ढोल ताशा वादनाचे जमा झालेले मानधनही अन्न सेवेसाठी वापरले आहे. पथकातील दहा ते बारा तरूण-तरुणी दररोज सहाशे ते आठशे लोकांना अन्न सेवा पुरवित आहेत.

जवळपास 50 ते 60 कुटुंबाना आतापर्यंत अन्नधान्याचे कीट वाटप करण्यात आले आहे. जेवणामध्ये सांबार भात, मसाले भात, लापशी, पुरीभाजी, सोयाबीन भाजी-भात, व डाळभात पुरविला जात आहे. लॉकडाउन संपेपर्यंत ही सेवा अविरत सुरु राहणार असल्याचे पथक प्रमुख अतुल दौंडकर यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhol Tasha Pathak Hungry Food Help Lockdown

Tags
टॉपिकस
Topic Tags: