Coronavirus : ‘आरटीओ’ देणार डिजीटल पास

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 5 April 2020

अत्यावश्‍यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या आणि सेवा देणाऱ्या वाहनांना आता प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडूनही (आरटीओ) डिजीटल (ई- पास) देण्यास शनिवारपासून सुरवात झाली आहे. ही सेवा अहोरात्र सुरू राहणार असून, किमान अर्ध्या तासात चालकांना हे पास ऑनलाईन पद्धतीने मिळतील.

पुणे - अत्यावश्‍यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या आणि सेवा देणाऱ्या वाहनांना आता प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडूनही (आरटीओ) डिजीटल (ई- पास) देण्यास शनिवारपासून सुरवात झाली आहे. ही सेवा अहोरात्र सुरू राहणार असून, किमान अर्ध्या तासात चालकांना हे पास ऑनलाईन पद्धतीने मिळतील.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पोलिसांच्या धर्तीवर हे पास (क्‍यूआर कोड) उपलब्ध होणार आहेत. राज्याच्या परिवहन आयुक्त कार्यालयाने याबाबत शुक्रवारी रात्री आदेश दिल्यावर शनिवारपासून पास देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 

शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमध्ये अत्यावश्‍यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना हे पास हवे असल्यास त्यांनी
https://transport.maharashta.gov.in या वेबसाईटवर ई- पास, या विभागावर क्‍लिक करायचे आहे. तेथे एमएच- १२ (पुणे) हा विभाग निवडल्यावर अर्ज उपलब्ध होईल. त्यावर तपशील भरायचा आहे. त्यानंतर अर्ज मंजूर झाल्यावर पास तयार होईल आणि संबंधितांना तो पीडीएफद्वारे ई- मेलवर पाठविला जाईल, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी दिली. 
 
प्रक्रिया २४ तास
पास देण्याची प्रक्रिया २४ तास सुरु असेल. त्यासाठी ३ शिफ्टमध्ये मोटार वाहन निरीक्षक आणि कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले. गेल्या ६ दिवसांत ‘आरटीओ’ने ५८४ पास दिले आहेत. अधिक माहितीसाठी नागरिकांना ’आरटीओ’मध्ये  २०-२६०५८०९० या दूरध्वनी क्रमांकावर किंवा Email -rto.१२-mh@gov.in या ई- मेल आयडी वर संपर्क साधता येईल, अशी माहिती भोर यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Digital pass provide by rto